TRENDING:

Vidarbha Weather Update: विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भातील हवामानात डिसेंबरअखेर मोठे बदल जाणवत आहेत. आता काही भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दण्यात आलाय.  
advertisement
1/5
विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील थंडीची लाट ओसरली असतानाच राज्यावर नवं संकट आलं आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय.
advertisement
2/5
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. 
advertisement
3/5
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 27 डिसेंबर रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश तर किमान 17 अंश सेल्सिअस राहील. पुढील 2 दिवस नागपूरमध्ये पावसाची स्थिती कायम असणार आहे. 
advertisement
4/5
वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यातील किमान तापमान सुद्धा 17 अंश सेल्सिअस इतकेच असणार आहे. या जिल्ह्यांत सुद्धा सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सामान्यतः ढगाळ आकाश राहून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 
advertisement
5/5
बुलढाणा, गडचिरोली या दोन जिल्ह्यातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील. तर अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातील किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. या जिल्ह्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather Update: विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल