TRENDING:

Nanded News : आई मरणाच्या दारातून परतली, लेकाने धुमधडक्यात लावलं आई-बाबांचं लग्न, अख्खं गाव नाचलं

Last Updated:
नांदेडमध्ये एका आजी आजोबांचा त्यांच्या मुलांनी पुन्हा एकदा लग्नाचा बार उडवून दिला आहे. या विवाहसोहळ्यामागेही एक विशेष कारण आहे. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/6
आई मरणाच्या दारातून परतली, लेकाने धुमधडक्यात लावलं आई-बाबांचं लग्न, PHOTOS
कुठल्याही नात्याला वयाचं बंधन नसतं म्हणतात तेच खरं आहे. आजवर अशा अनेक लग्नाच्या बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील, ज्यांनी त्यांच्या वयाच्या उत्तरार्धात आपल्या जोडीदारासह पुन्हा एकदा नव्याने रेशीमगाठ बांधली.
advertisement
2/6
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे हा विवाह पार पाडण्यासाठी दाम्पत्याच्या मुलांनीच पुढाकार घेतला आहे.
advertisement
3/6
सात वर्षांपूर्वी आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होती. अथक प्रयत्न करुनही आई वाचण्याची हमी नव्हती. पण वडिलांनी आईची साथ सोडली नाही. मला सोडून तुला जाऊ देणार नाही, असं वडील म्हणाले आणि त्याच हिमतीवर आई पुन्हा बरी झाली.
advertisement
4/6
आईवडील दोघांच्या प्रेमाचा सोहळा म्हणुन मुला-मुलींनी आपल्या आई वडिलांचे पुन्हा एकदा धूम धडाक्यात लग्न लावले. गागलेगाव येथील 65 वर्षीय विठ्ठल बुद्धलवाड आणि त्यांच्या पत्नी राजाई बुद्धलवाड यांच्या लग्नाचा आज 50 वाढ दिवस आहे. याच निमित्ताने मुलगा नागनाथ बुद्धलवाड आणि मुलगी अनुसया सैबलवाड या दोघांनी आई वडिलांचा विवाह सोहळा आज साजरा केला.
advertisement
5/6
या लग्नाची आमंत्रणपत्रिका छापून नातेवाईक आणि अख्ख्या गावाला वाटण्यात आली. गावात भव्य मंडप उभारण्यात आला. नवरदेवाची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
6/6
आजोबांच्या मिरवणुकीत नातवंडांसह वऱ्हाडींनी बँड बाज्याच्या तालावर ठेका धरला. नवरीची एन्ट्री पण जबरदस्त झाली. लग्न मंडपात मंगलाष्टके झाली, अक्षदा पडल्या आणि लग्न जोरात पार पडलं. पंचक्रोशित याच लग्नाची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : आई मरणाच्या दारातून परतली, लेकाने धुमधडक्यात लावलं आई-बाबांचं लग्न, अख्खं गाव नाचलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल