TRENDING:

'पतीचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबत अश्लील PHOTO दाखवायचा अन्....' नेहानं 7 पानांच्या चिठ्ठीतून सांगितलं धक्कादायक सत्य

Last Updated:
7 पानांच्या चिठ्ठीत जे लिहिलं ते फार भयंकर आणि हृदय पिळवटून टाकणारं....लग्नाला सहा महिनेही झाले नाहीत अन् असा क्रूर आणि भयंकर प्रकार नाशिकच्या या नेहासोबत होत होता... अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं
advertisement
1/5
'गर्लफ्रेंडसोबत अश्लील PHOTO दाखवायचा अन्' 7 पानांच्या चिठ्ठीतून सांगितलं सत्य
नाशिक, लक्ष्मण घाटोळ: लग्नाला अवघे सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत अन् नाशिकच्या नेहाच्या नशीबी नको ते आलं. गौरीनंतर आता नेहानं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण नाशिक हादरलं. 7 पानांची चिठ्ठी मागे सोडून त्याचे फोटो भावाला पाठवून नेहानं टोकाचं पाऊल उचललं. लग्नाला सहा महिने झाले नाहीत तोच सासरच्यांनी छळायला मानसिक त्रास द्यायला नवऱ्याने मारहाण करायला सुरुवात केली.
advertisement
2/5
रोज चारित्र्यावरुन संशय घेणं, खर्चावरुन बोलणं, घरातलं सगळ्यांचं सगळं काम करुनही सतत पावलोपावली अपमान करणं आणि शिवीगाळ करणं असे एक नाही तर अनेक भयंकर प्रकार सुरू झाले. इतकंच नाही तर तिची कौमार्य चाचणी देखील करण्यात आली. ही चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा मानसिक छळ कऱण्यात आला. नंदेकडून सासू आणि नवऱ्याचे कान भरणं सुरूच होतं. त्यात आणखी तेल ओतण्याचं काम दुसऱ्या नंदा करत राहिल्या.
advertisement
3/5
पाळी आली की नाही ते चेक करण्यासाठी पॅड लावून तपासलं जात होतं. कौमार्य चाचणी दिल्यानंतर नवरा शांत झाला. 15 लाख रुपये देऊन लग्नाचा खर्च केला तरीही अपमान आणि नावं ठेवण्यात आली. माहेरुन 20 हजार रुपये आणले तरीही सगळं माहेरुन घेऊन ये असं सांगितलं जात होतं. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर नेहानं आयुष्याचा शेवट केलं. हे सगळं सहन करण्यापलीकडे झालं होतं.
advertisement
4/5
पतीचे अनैतिक संबंध होते. त्याने गर्लफ्रेंडसोबतचे नको त्या अवस्थेतले फोटोही दाखवले. माझ्या सासरच्या लोकांनी माझी फसवणूक केली. बळजबरीनं माहेरहून पैसे आण असं सांगितलं गेलं. माहेरी गेल्यावर माझ्या माहेरच्यांचेही त्यांनी कान भरायला सुरुवात केली. ही सासरी काही काम करत नाही असं सांगून वितुष्ट आणायला लागले. माझं जगणं नकोसं केलं. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच कायमचं संपवण्याचं ठरवलं असं म्हणत नेहानं आपलं आयुष्य संपवलं आहे.
advertisement
5/5
या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नेहाने ७ पानांची लिहिलेली ही चिठ्ठी अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'पतीचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबत अश्लील PHOTO दाखवायचा अन्....' नेहानं 7 पानांच्या चिठ्ठीतून सांगितलं धक्कादायक सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल