TRENDING:

Maharashtra Kesari : पैलवानांवर कारवाईचा इशारा; तरी धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरीची तयारी जोरात; पाहा PHOTO

Last Updated:
Maharashtra Kesari : धाराशिवमध्ये कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर कार्यवाही करण्याचा इशारा रामदास तडस यांच्या कुस्ती संघटनेने दिला आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
advertisement
1/6
PHOTO पैलवानांवर कारवाईचा इशारा; तरी धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरीची तयारी जोरात
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद सुरूच आहे. पुणे येथे संपन्न झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवैद्य आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केला आहे.
advertisement
2/6
धाराशिवमध्ये येत्या 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
3/6
या स्पर्धेच्या तयारीसाठी आज धाराशिवमध्ये कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
4/6
धाराशिवमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये साडेनऊशे मल्ल सहभागी होतील, अशी माहितीही आयोजक यांनी दिली आहे. दरम्यान या आरोप प्रत्यारोपाने महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा वाद आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
advertisement
5/6
तर दुसरीकडे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर कार्यवाही करण्याचा इशारा भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संघटनेने दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धेला मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते व मल्ल हजेरी लावणार आहेत.
advertisement
6/6
पाच कोटींची बक्षीसे यासाठी ठेवण्यात आलेली आहे. मात्र, कुस्तीचा फड रंगायला काही काळ बाकी असतानाच नवा वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख हा मानकरी ठरला आहे. पण पुण्यातील कुस्ती स्पर्धा ही भाजपप्रणित असून महराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची काही संबंध नसल्याचं वेळोवेळी सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
Maharashtra Kesari : पैलवानांवर कारवाईचा इशारा; तरी धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरीची तयारी जोरात; पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल