Dharashiv: बापासाठी कोयता घेऊन पळत आला अन् जोरात पडला, उठल्यावर सुरवसेंना जागेवरच संपवलं, PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
दोघा बाप बेट्यांचं कृत्य पाहून इतर लोकही बाजूला झाले. सोहनने सुरवसे यांच्या मानेवर, तोंडावर, पोटावर आणि पाठीवर कोयत्याने तब्बल १७ वार केले. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
advertisement
1/10

धाराशिव जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गायकवाड बाप-बेट्यांनी मिळून पप्पू सुरवसे यांची कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या प्रकरणी मुलाला अटक केली आहे. या प्रकरणामुळे नळदुर्गमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
2/10
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे 2025 रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमासार ही घटना घडली. शिवराज हॉटेल अँड बारसमोर रात्री साडेआठ वाजता जयकुमार गायकवाड हा सुर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे (वय ४८) यांच्यासोबत बाचाबाची करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. दोघांची बाचाबाची सुरू असताना जयकुमारचा मुलगा सोहन गायकवाड हा बाहेरून एक मोठा कोयता (झांबळ कोयता) घेऊन धावत आला.
advertisement
3/10
सोहन जसा धावत आला पण पाऊस पडल्यामुळे फरशीवर पाणी साचलेलं होतं, तो तसाच पाय घसरून पडला. तो खाली पडला हे त्याचा बाप जयकुमार आणि सुरवसे यांनी पाहिलं. सोहन लगेच उठला आणि त्याने सुरवसे यांच्या मानेवर कोयत्याने वार केला. ज्यामुळे ते खाली कोसळले.
advertisement
4/10
त्यानंतर सोहनने त्यांच्या डोक्यात, गळ्यावर आणि इतर ठिकाणी कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी, जयकुमार गायकवाड हा पप्पू सुरवसे यांना वाचवण्यासाठी जे कुणी पुढे येत होता, त्याला अडवत होता.
advertisement
5/10
दोघा बाप बेट्यांचं कृत्य पाहून इतर लोकही बाजूला झाले. सोहनने सुरवसे यांच्या मानेवर, तोंडावर, पोटावर आणि पाठीवर कोयत्याने तब्बल १७ वार केले. एवढंच नाहीतर सुरवसे आडवे पडले होते, त्यांना सरळ करून समोरून मानेवरही कोयत्याने वार केला.
advertisement
6/10
आरोपी जयकुमार हा हॉटेलमधील इतर लोकांना सोहन जे करत आहे, ते करू द्या, असं म्हणत एक एकला खेचून बाजूला करत होता.
advertisement
7/10
यावेळी सोहन हा बापाला मी तुमच्यासोबत आहे. कोयता दाखवून तो एकाप्रकारे जो अडवा येईल त्याला संपवेल, असंच सांगत असल्याचं दिसून येत आहे. बाप जयकुमारही हात उंचावरून पोराला समर्थन देत असल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
advertisement
8/10
सुरवसेंची हत्या का केली? पप्पू सुरवसे यांच्या निर्घृण खून प्रकरणी त्यांची पत्नी करुणा सूर्यकांत सुरवसे (वय ४२) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात २८ मे २०२५ रोजी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, बौध्दनगर, नळदुर्ग येथील जयकुमार गायकवाड आणि त्याचा मुलगा सोहन गायकवाड यांनी संगनमत करून, पप्पू सुरवसे हे करत असलेल्या सामाजिक कार्याच्या रागातून हा खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
advertisement
9/10
करुणा सुरवसे सध्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पनवेल इथं वास्तव्यास आहेत, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती पप्पू सुरवसे हे मूळचे नळदुर्ग येथील भिमनगरचे रहिवासी असून समाजकार्याची आवड असल्याने ते अधूनमधून नळदुर्गला येत असत. मात्र, बौध्दनगर येथील जयकुमार गायकवाड हा पप्पू सुरवसे यांच्या नळदुर्गमधील सामाजिक कार्यात विनाकारण अडथळा आणत होता. "तू पनवेलहून इथे येऊन समाजकार्य का करतोस? आम्ही इथले कामकाज बघून घेऊ, तू ढवळाढवळ करू नकोस," असं म्हणून जयकुमार गायकवाड हा पप्पू यांच्यासोबत नेहमी भांडणत करत असे, असे पप्पू यांनी पत्नी करुणा यांना सांगितलं होतं. गेल्या बुद्धपौर्णिमेला देखील जयकुमारने पप्पू यांच्यासोबत भांडण केल्याचे त्यांनी पत्नीला सांगितलं होतं.
advertisement
10/10
या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी जयकुमार गायकवाड व त्याचा मुलगा सोहन गायकवाड (दोघे रा. बौध्दनगर, नळदुर्ग) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०३ ( १ ), ३ ( ५ ) कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत यादव हे काम पाहत आहेत. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एक आरोपी जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे व त्याच्यावर पोलीस पाळत ठेवून आहेत. आता फिर्यादीत वडील व मुलाचे नाव स्पष्ट झाल्याने पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Dharashiv: बापासाठी कोयता घेऊन पळत आला अन् जोरात पडला, उठल्यावर सुरवसेंना जागेवरच संपवलं, PHOTOS