Washim : 60 कुटुंबांविरोधात घातपाताचा कट? विहिरीत मिसळलं विषारी द्रव्य, वाशिमच्या गावात घबराट
- Published by:Shreyas
Last Updated:
वाशिम तालुक्यातल्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (किशोर गोमाशे, प्रतिनिधी)
advertisement
1/4

वाशिम तालुक्यातल्या एका गावामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गावातल्या 50-60 कुटुंबांविरोधात घातपाताचा कट तर नव्हता ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
2/4
वाशिम तालुक्यातील एकबुर्जी गावातील 50 ते 60 कुटुंबांना खासगी नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञात इसमाने 10 ते 15 लिटर विषारी द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
3/4
पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विषारी द्रव्य टाकल्यामुळे पाण्याचा रंगही बदलला. सर्व कुटुंबांना पाणी पुरवठा करण्याआगोदर हा गंभीर प्रकार लक्षात आल्याने गावातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
advertisement
4/4
विहिरीत विषारी द्रव्य मिसळल्याचं कळताच एकबुर्जी परिसरातील शेतात पोलीस पथक आणि शासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. विहिरीतील पाण्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Washim : 60 कुटुंबांविरोधात घातपाताचा कट? विहिरीत मिसळलं विषारी द्रव्य, वाशिमच्या गावात घबराट