TRENDING:

Sangli Loksabha : संजयकाका की पाटील? सांगलीत कोण मारणार बाजी? कार्यकर्त्यांमध्ये थेट बुलेटची पैज

Last Updated:
Sangli Loksabha : सांगली लोकसभेत कोण निवडून येणार? यावर कार्यकर्त्यांमध्ये थेट बुलेटची पैज लावण्यात आली आहे.
advertisement
1/6
संजयकाका की पाटील? सांगलीत कोण मारणार बाजी? कार्यकर्त्यांमध्ये थेट बुलेटची पैज
मागील दोनचार वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून दोन पक्ष निर्माण झाले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होत आहे. परिणामी सर्व देशाचं लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागलं आहे.
advertisement
2/6
राज्यातील काही जागांवर तर अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ त्यापैकीच एक मानला जातो.
advertisement
3/6
यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांनी तिकीट देण्यात आलं. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे गेली. ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आखाड्यात उतरवलं. दुसरीकडे नाराज झालेले काँग्रेस नेते विशाल पाटील अपक्ष मैदानात आहेत.
advertisement
4/6
या निवडणुकीवरुन आता कार्यकर्त्यांमध्ये लाखोंच्या पैजा लागल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल.
advertisement
5/6
तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे यात नमूद केलं आहे.
advertisement
6/6
या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Loksabha : संजयकाका की पाटील? सांगलीत कोण मारणार बाजी? कार्यकर्त्यांमध्ये थेट बुलेटची पैज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल