TRENDING:

Satara : साताऱ्यात बाजीगर सिनेमासारखी घटना, बॉयफ्रेंडने प्रेयसीला इमारतीवरून खाली फेकलं, धक्कादायक कारण समोर

Last Updated:
वादानंतर प्रियकर ध्रृवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला आहे.
advertisement
1/5
साताऱ्यात बाजीगर सिनेमासारखी घटना, बॉयफ्रेंडने प्रेयसीला इमारतीवरून खाली फेकलं
कराड शहरातील एक धक्कादाय घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची घटना समोर असुन. आरुषी सिंग असे त्या प्रेयसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
2/5
हरियाना येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे ढकलून देणाऱ्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रियकर आणि प्रेयसी कराड येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी आरुषी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हा पासून या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्या नंतर त्यांनी एकत्रच कराडातील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
advertisement
3/5
ध्रृव हा मेडीकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. काल ध्रृवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असे म्हणत यावरुन प्रियकर ध्रृव आणि आरुषीची यांच्यात जोरात वादावादी झाली.
advertisement
4/5
वादानंतर प्रियकर ध्रृवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
advertisement
5/5
रात्री उशीरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 (1) प्रमाणे ध्रृववर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
Satara : साताऱ्यात बाजीगर सिनेमासारखी घटना, बॉयफ्रेंडने प्रेयसीला इमारतीवरून खाली फेकलं, धक्कादायक कारण समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल