TRENDING:

'देखणे ते दृश्य, पाहून मोहित होती पर्यटक!', साताऱ्यातील रिव्हर्स वॉटर फॉलची पर्यटकरांना भूरळ, photos

Last Updated:
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. पर्यटकांमध्ये कायमच काहीतरी नवीन बघण्याची क्रेझ दिसून येते. (शुभम बोडके/सातारा, प्रतिनिधी)
advertisement
1/6
photos : 'देखणे ते दृश्य, पाहून मोहित होती पर्यटक!', साताऱ्यातील रिव्हर्स वॉटर..
सडा वाघापूर अन्‌ "रिव्हर्स पॉईंट' अर्थातच उलटा धबधबा हे समीकरण अलिकडील काळात पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण बनले आहे.
advertisement
2/6
डोळ्याचे पारणे फेडणारा असा उलटा धबधबा आणि इथली मजा अनुभवण्यासाठी, त्याचबरोबर या उलट्या धबधब्याचे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटक बहुसंख्येने इथे भेट देताना दिसतात.
advertisement
3/6
निसर्गाचे आगळे कौतुक म्हणजे सडा वाघापूर येथील "रिव्हर्स पॉईंट'. कड्यावरून खाली उतरणारे पाणी वाऱ्याच्या वेगाने पुन्हावर येते.
advertisement
4/6
वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे 100 फुटांपर्यंत ते उलटे पठारावर फेकले जाते. त्यातून तयार होणारे पाण्याचे कारंजे चिंब करतात. उलट्या धबधब्याचा हा आविष्कार पूर्णतः वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे.
advertisement
5/6
नुकताच या भागात पावसाने मोठे हजेरी लावली आहे. त्यामुळे उलटा धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटक येथे मोठी गर्दी करताना देखील पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा दाब अधिक असल्यास अतिशय मोहक व डोळ्यांचे पारणे फेडणारा असा नजारा दृष्टीस पडत आहे.
advertisement
6/6
जर तुम्हाला एखाद्या विकेंडला अशा थ्रिलिंग ठिकाणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सातारा येथील सडा वाघापूरचा हा रिव्हर्स पॉइंट अतिशय बेस्ट ठिकाण ठरेल. त्याचबरोबर हिरवागार डोंगर, धुक्याची चादर असं अद्भुत निसर्गाचं दर्शन या ठिकाणी पर्यटकांना घडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
'देखणे ते दृश्य, पाहून मोहित होती पर्यटक!', साताऱ्यातील रिव्हर्स वॉटर फॉलची पर्यटकरांना भूरळ, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल