अतिवृष्टी होणाऱ्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई, जलसंधारणासाठी सरसावले जावळीकर, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात अतिवृष्टी होत असली तरी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. हीच बाब लक्षात घेऊन पाणी चळवळीला गती मिळत आहे.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्ह्यातील</a> जावळी तालुका निसर्ग संपन्न मानला जातो. डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी होत असते. अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळीची ओळख असली तरी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. हीच बाब लक्षात घेऊन तालुक्यात पाणी चळवळीला गती मिळत आहे.
advertisement
2/7
जावळीत पर्यावरण व जलसंधारणाच्या बाबतीत जनजागृती होत आहे. जलसंधारणाची कामे सुरू असून या चळवळीत महिलांचा तसेच युवक, युवतींचा सहभाग लक्षणीय आहे. हे एक आशादायक चित्र आहे.
advertisement
3/7
सध्या आलेवाडी येथील डोंगरावर गेले 50 दिवस सतत जलसंधारणाचे काम सुरू आहे. नाम फाउंडेशन व ग्रामस्थांच्या सहभागातून अनेक सीसीटी, छोटे बंधारे पुर्णत्वास गेले आहेत. गेली दोन महिने राबून आलेवाडीकरांनी डोंगररांगात केलेले जलसंधारणाचे काम तालुक्याला दिशादर्शक ठरत आहे.
advertisement
4/7
या गावाचा आदर्श घेऊन वाई तालुक्यातील वेळे, बोपर्डी, अनवडी व इतर गावचे ग्रामस्थ भेट देऊन पाहणी करून जात आहेत. तर कुसूंबीमध्ये ही जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा या चळवळीच्या माध्यमातून म्हाते बुद्रूक या गावातही चांगले काम झाले आहे.
advertisement
5/7
बामणोली तर्फ कुडाळ येथील ग्रामस्थांनी गावालगत्या टेकडीवर 2100 देशी वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारची झाडे आहेत. या वृक्षारोपणाला दोन वर्षे झाली असून यातील 2 हजार झाडे जगवली आहेत. यासाठी त्यांनी या टेकडीवर विहीर काढली आहे, तसेच सीसीटी बंधारे पण घेतले आहेत.
advertisement
6/7
कुडाळ येथील पिंपळबनाचे कामही मोठ्या जोमाने सुरू आहे. कुडाळ मधील युवकांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा बगीचा कुडाळी नदीच्या काठावर फुलवला आहे. केळघर भागातही बंधाऱ्याची कामे लोकसहभाग व दानशूर व्यक्तींच्या देणग्यांमधून सुरू आहेत.
advertisement
7/7
मित्रमेळा सामाजिक संस्था सुद्धा पर्यावरण व वृक्ष संगोपन चळवळीसाठी कार्यरत आहे. गेले 3-4 वर्षे सातत्याने वेण्णा नदी स्वच्छता मोहीम, वणवा प्रतिबंधक मोहीम राबवत आहेत. अशा प्रयत्नांतून नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या जावळी तालुका निश्चित पर्यावरण व जलसंधारणामध्ये राज्य पातळीवर नावारूपाला येईल असे चित्र दिसत आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
अतिवृष्टी होणाऱ्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई, जलसंधारणासाठी सरसावले जावळीकर, PHOTOS