अमेरिकन गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. जोसेफ सलहब यांनी पचनाविषयी खास टिप्स दिल्यात. पोट निरोगी आणि पचन सुरळीत ठेवायचं असेल, तर काही फळांमधलं मॅग्नेशियम खूप आवश्यक आहे. ही फळं चवीला चांगली आहेतच शिवाय यामुळे आतड्यांतील स्नायूंना आराम मिळतो आणि बद्धकोष्ठता आणि पोट फुगणं यासारख्या समस्यांही कमी होतात.
Health Tips : दूध - मधाचं मिश्रण करेल जादू, शरीराला पोषण देणारं सुवर्ण अमृत, वाचा सविस्तर
advertisement
कलिंगड
कलिंगड दिसतही छान. पाणीदार आणि गोडवा म्हणून हे फळ आवडतंच. पण या फळाचा एक फायदा, ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं ते म्हणजे एका तुकड्यात सुमारे दहा मिलीग्राम मॅग्नेशियम असतं. तसंच, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं आतडी हायड्रेटेड राहतात, मल मऊ होतो. उन्हाळ्यात टरबूज केवळ ताजेपणाचा स्रोत नाही तर पचन सुरळीत करण्याचे रहस्य देखील आहे.
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडो हे निरोगी चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्स आणि फायबरसाठी ओळखलं जातं, पण एका मध्यम आकाराच्या अॅव्होकॅडोमध्ये सुमारे 58 मिलीग्राम मॅग्नेशियम देखील असतं. त्याच्या मऊसुत पोतामुळे पोटावर दबाव येत नाही आणि बद्धकोष्ठता कमी होते. फायबर, निरोगी चरबी आणि मॅग्नेशियमचे हे मिश्रण नैसर्गिकरित्या पचनास मदत करते.
Scrub : घरी तयार करा फेशल स्क्रब, चेहरा दिसेल स्वच्छ आणि उजळ, या पर्यायांचा करा वापर
बेरी
ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी सारख्या बेरीमधे अँटीऑक्सिडंट्स तसंच प्रति कप 29 मिलीग्राम मॅग्नेशियम असतं.
यातल्या विरघळणाऱ्या फायबरमुळे आतडी स्वच्छ राहतात आणि चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळतं. बेरीज या tiny म्हणजे 'लहान पॉवरहाऊस' असं तज्ज्ञ म्हणतात. आतड्यांच्या सुरळीत हालचालींसाठी हे आवश्यक आहे.
अननस
अननस हे त्याच्या ब्रोमेलेन एंझाइमसाठी प्रसिद्ध आहे, यामुळे पचन सोपं होतं. परंतु त्यात प्रति कप 20 मिलीग्राम मॅग्नेशियम देखील असतं. यामुळे आतड्यांतील जळजळ कमी होते आणि पचन प्रक्रिया सुरळीत राहते.
किवी
किवीमधे व्हिटॅमिन सी आहे, आणि त्यात सुमारे सतरा मिलीग्राम मॅग्नेशियम आणि एक विशेष एंझाइम अॅक्टिनिडिन असते. यामुळे प्रथिनांचं पचन जलद होतं आणि बद्धकोष्ठता कमी होते.