photos : सातारच्या डोंगरावरील कड्याचे मोठाले दगड कोसळू लागले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारच्या डोंगरावरील कड्याचे मोठे मोठे दगड सुटल्याने काळोशी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. हजारो टन वजनाचे मोठमोठे दगड गावाच्या दिशेने घसरू लागल्याने याठिकाणी नागरिकांच्या मनात भीती पसरली आहे. (शुभम बोडके/प्रतिनिधी, सातारा)
advertisement
1/7

सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडचा भाग हा डोंगर भाग म्हणून ओळखला जातो. या डोंगर पायथ्यावर वाड्या, वस्त्यांचे वास्तव्य पाहायला मिळतं.
advertisement
2/7
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी शेकडो गाव आणि वस्त्यांचे वास्तव्य आहे. मात्र, पावसाळा आला की या गावांवर लँड स्लाईडचे नैसर्गिक संकट ओढवते. अनेक घाट माथ्यांवरुन मोठमोठे दगड, दरड, कोसळण्याचे प्रकार पाहायला मिळतात.
advertisement
3/7
असेच साताऱ्यातील सज्जनगड भागातील काळोशी गावावर एका डोंगराचा कडा कोसळण्याची भीती आहे.
advertisement
4/7
या डोंगरावरील कड्याचे मोठं मोठे दगड सुटल्याने ते कधी ही खाली कोसळू शकतात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
5/7
हजारो टन वजनाचे महाकाय दगड, उभे आठ ते नऊ फूट आणि आडवे 12 ते 13 फूट एवढे मोठमोठे दगड गावाच्या दिशेने घसरत असल्याने गावकऱ्यांच्या भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
6/7
याबाबत अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करुनही अद्याप कोणतीच पावले उचलली गेली नाहीत.
advertisement
7/7
जर एखाद्या मोठा पाऊस या भागात झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते आणि शेकडो नागरिकांचे जीव जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या बाबींकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
photos : सातारच्या डोंगरावरील कड्याचे मोठाले दगड कोसळू लागले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण