TRENDING:

SBI Recruitment: बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, मिळणार 80 लाखांचं पॅकेज

Last Updated:
SBI Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती जाहीर झाली आहे. वय 50 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे.
advertisement
1/4
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार 80 लाखांचं पॅकेज
जर तुम्ही ग्रॅज्युएट आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी करिअर संधी मानली जात आहे.
advertisement
2/4
अनुभवाच्या बाबतीत, उमेदवारांना बँकिंग, ई-कॉमर्स किंवा आयटी क्षेत्रात किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे बंधनकारक आहे. अर्जदारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. ही नियुक्ती 5 वर्षांच्या कंत्राटी स्वरूपात असणार आहे.
advertisement
3/4
भरतीमध्ये आकर्षक वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. वरिष्ठ पदांसाठी वार्षिक पॅकेज 40 लाखांपासून 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर डेप्युटी मॅनेजर स्तरावरील पदांसाठी मासिक वेतन 64,820 ते 93,960 रुपये इतके असणार आहे.
advertisement
4/4
एकूणच, बँकिंग किंवा आयटी क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांसाठी SBI मधील ही भरती करिअरला नवी दिशा देणारी ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
SBI Recruitment: बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, मिळणार 80 लाखांचं पॅकेज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल