Solapur Flood: बार्शीत आभाळ फाटलं, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल; महापुराचे धडकी भरवणारे फोटो समोर
- Published by:Prachi Amale
- Reported by:Pritam Pandit
Last Updated:
बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगांव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसलाय.
advertisement
1/7

- बार्शी तालुक्याला ढगफुटीसदृश्य पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय..रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय...तर शेताला तलावाचं.....हातातोंडाशी आलेलं उत्पन्न मातीमोल झालंय.
advertisement
2/7
नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी....पिकं पिवळी पडलेली.....शेंगा नासून गेलेल्या....शेतकरी चिंतेत सापडला आहे.
advertisement
3/7
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ही परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी नाही...सध्या राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात थोड्याफार फरकानं हेच संकट दिसून येतंय.
advertisement
4/7
बार्शीतील चांदणी नदीला पूर आल्यानं गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेलेत...त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटलाय.
advertisement
5/7
या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालंय. बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगांव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसलाय.
advertisement
6/7
वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. सप्टेंबर संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे
advertisement
7/7
.काही भागात 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झालाय..त्याचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसलाय...त्यामुळे आता तरी सरकारनं तातडीनं पावलं उचलत प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Solapur Flood: बार्शीत आभाळ फाटलं, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल; महापुराचे धडकी भरवणारे फोटो समोर