Aajibainchi Shala: नऊवारी साडी अन् पाठीवर दप्तर, ठाण्यातील अनोखी शाळा, सगळ्याच विद्यार्थिनी साठीपार!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
aajibaichi Shala: शाळेत शिकणाऱ्या आजीबाईंचे वय सुमारे 60 वर्षांपासून सुरू होऊन 95–96 वर्षांपर्यंत आहे. या शाळेत कमी वयाची विद्यार्थिनी म्हणजे सुमारे 60 वर्षांची आहे.
advertisement
1/7

शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे ठाण्यातील फांगणे गावातील आजीबाईंनी. भारतातील पहिली आजीबाईंची शाळा 2016 साली येथे सुरू झाली. या शाळेचा संकल्पना शिक्षक योगेंद्र बांगर यांनी मांडली, ज्यांनी ग्रामीण आजीबाईंसाठी शिक्षणाची नवी संधी उभारण्याचा निर्धार केला.
advertisement
2/7
ठाण्यातील फांगणे गावात दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते, ज्यात गावातील स्त्रिया पारायण वाचत असतात. परंतु काही आजीबाई वाचन शिकलेल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, "आम्ही शाळा शिकलो असतो तर आम्हालाही सही मिळाली असती, आम्हीही पारायण वाचायला बसलो असतो." या भावना ऐकून योगेंद्र बांगर यांना ‘आजीबाईंची शाळा’ सुरू करण्याची कल्पना सुचली.
advertisement
3/7
शाळा सुरू केल्यानंतर योगेंद्र बांगर दररोज ठाण्यातून फांगणे गावात प्रवास करून येतात आणि आजीबाईंस शिकवतात. ते स्वतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरबाड नं. 2 येथील शिक्षक आहेत, तसेच आजीबाईंची शाळा देखील स्वतः चालवतात.
advertisement
4/7
फांगणे गाव जवळपास 70 घरांचं असून 360 लोकसंख्येचे आहे. गाव मोरोशी फाट्यापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाच्या चारही बाजूंनी डोंगररांगा पसरलेले आहेत आणि गाव निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. गावाच्या सुरुवातीस कळकांचे कुंपण असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे.
advertisement
5/7
शाळेत शिकणाऱ्या आजीबाईंचे वय सुमारे 60 वर्षांपासून सुरू होऊन 95–96 वर्षांपर्यंत आहे. या शाळेत कमी वयाची विद्यार्थिनी म्हणजे सुमारे 60 वर्षांची तर सर्वात जास्त वयाची विद्यार्थिनी 95–96 वर्षांची आहे. शाळा फक्त शनिवार आणि रविवारी चालते. इथे आजीबाई मराठी गाणी, कविता, गणिताचे प्राथमिक धडे शिकतात. वर्गातील गणवेश गुलाबी रंगाची नऊवारी साडी आहे
advertisement
6/7
योगेंद्र बांगर फक्त शिक्षणापुरते मर्यादित राहत नाहीत; त्यांनी शाळेतल्या आजीबाईंसाठी उद्योग आणि रोजगाराचे मार्ग तयार करण्याची योजना आखली आहे. लवकरच आजीबाई फूड आणि ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार करून विक्रीद्वारे उत्पन्न मिळवतील. या उपक्रमामुळे केवळ आर्थिक स्वावलंबन मिळणार नाही, तर गावातील आजीबाईंचा आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागही वाढणार आहे.
advertisement
7/7
सुरुवातीला आजीबाईंना केवळ वाचन-लेखन शिकवले जात असे, पण आता त्या स्वतः कविता तयार करतात, गाणी गातात आणि आपले विचार व्यक्त करतात. त्यामुळे केवळ शिक्षण नव्हे तर त्यांचा सृजनशील विकासही होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
Aajibainchi Shala: नऊवारी साडी अन् पाठीवर दप्तर, ठाण्यातील अनोखी शाळा, सगळ्याच विद्यार्थिनी साठीपार!