TRENDING:

'माझ्यासोबत 8 वर्ष राहिला अन् आता दुसरीशी लग्न करतोय', प्रियकराने धोका दिल्यावर तृतीयपंथीयाने आयुष्य संपवलं; सोलापूर हादरलं

Last Updated:
शासकीय रुग्णालय परिसरात तृतीयपंथीयांची मोठी गर्दी झाली. समुदायातील अनेकांनी संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली. प्रकाश कोळीच्या मृत्यूने संपूर्ण तृतीयपंथीय समाजात शोककळा पसरली आहे.
advertisement
1/8
प्रियकराने धोका दिल्यावर तृतीयपंथीयाने आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं
सोलापूर जिल्ह्यातील बाळे परिसरात तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या विश्वासघातामुळे घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
2/8
आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव प्रकाश कोळी असे आहे. तर सुजित जमादार असं धोका देणाऱ्या प्रियकराचं नाव आहे.
advertisement
3/8
त्याने मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी तयार केलेला व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रकाशने आपली व्यथा सांगितली आहे. माझ्यासोबत लग्न केले आणि आठ वर्षे माझ्यासोबत राहिला.
advertisement
4/8
आठ वर्ष एकत्र राहिले, आता तो दुसरीशी लग्न करत असल्याने दिला जीव त्याने मला मारहाण केली, मला खूप त्रास दिला. मी सगळं सहन केले आणि आता तो मला सोडून दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. त्यामुळे मी जीव देत आहे, असं सांगितल्यानंतर प्रकाश कोळीने गळफास घेतला.
advertisement
5/8
सुजित जमादार याचे लग्न ठरल्याची माहिती प्रकाशला मिळाल्यानंतर तो मानसिक तणावात होता. आपल्याला फसवून प्रियकर दुसऱ्या नात्यात अडकत असल्याची भावना त्याला सतावत होती.
advertisement
6/8
घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालय परिसरात तृतीयपंथीयांची मोठी गर्दी झाली. समुदायातील अनेकांनी संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली. प्रकाश कोळीच्या मृत्यूने संपूर्ण तृतीयपंथीय समाजात शोककळा पसरली आहे.
advertisement
7/8
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
8/8
सुजित जमादार याच्याकडूनही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणामुळे सोलापुरात मोठी चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'माझ्यासोबत 8 वर्ष राहिला अन् आता दुसरीशी लग्न करतोय', प्रियकराने धोका दिल्यावर तृतीयपंथीयाने आयुष्य संपवलं; सोलापूर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल