समंथाच्या लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी, नागा चैतन्य आणि शोभिता यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा जल्लोष केला आहे. शोभिताने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाच्या खास क्षणांचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
त्याच्याशिवाय मी अपूर्ण
नागा आणि शोभिता यांनी त्यांच्या लग्नाच्या खास आठवणी आणि अनेक अनसीन क्लिप्स असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोभिताने नागा चैतन्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल भावनिक मत व्यक्त केले. ती म्हणाली, "मला वाटत नाही की कोणताही माणूस अपूर्ण असतो आणि कोणीतरी येऊन त्याला पूर्ण करतो. आपण स्वतःमध्ये पूर्ण असतोच."
advertisement
ती पुढे म्हणते, "तरीही, मी हे म्हणेन की मी त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. सकाळी उठताना आणि रात्री झोपताना त्याचाच विचार माझ्या मनात येतो. तो माझ्या आयुष्यात आहे हे जाणून खूप समाधान मिळते. मी त्याच्यासोबत असताना काहीही जिंकू शकते," अशा शब्दांत शोभिताने नागावरील प्रेम व्यक्त केले आहे.
कुटुंबाच्या सानिध्यात बांधली लग्नगाठ
समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाल्यानंतर काही काळातच नागा आणि शोभिता यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे प्रेम फुलले. दोघांनी पारंपरिक हिंदू रितीरिवाजानुसार ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते.
एकीकडे समंथाने तिच्या आयुष्यातील दुसरा टप्पा सुरू केला असताना, नागा आणि शोभिता त्यांच्या पहिल्या वैवाहिक वर्षाचा आनंद उत्साहाने साजरा करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या आठवणींचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
