Madhuri Dixit: अरेंज नाही, तर माधुरी दीक्षितने केलं लव्ह मॅरेज, लग्नाच्या 26 वर्षांनी केला मोठा खुलासा; कोणी जुळवलेलं नातं?

Last Updated:
Madhuri Dixit: गेली कित्येक वर्षे सर्वांना वाटत होते की माधुरीचे लग्न हे अरेंज्ड आहे, पण आता खुद्द माधुरीने तिचे लव्ह मॅरेज असल्याचा खुलासा केला आहे.
1/9
मुंबई: ९० च्या दशकातील 'धक धक गर्ल' आणि आपल्या अदांनी चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तितकीच सुंदर आणि उत्साही दिसते. तिने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत विवाह करून बॉलिवूडला रामराम ठोकला होता.

advertisement
2/9
माधुरीच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या लग्नाची बातमी बाहेर येताच अनेकांचे हृदय तुटले होते. गेली कित्येक वर्षे सर्वांना वाटत होते की माधुरीचे लग्न हे अरेंज्ड आहे, पण आता खुद्द माधुरीने तिचे लव्ह मॅरेज असल्याचा खुलासा केला आहे.

3/9
माधुरी दीक्षितने नुकतीच रणवीर अल्लाहबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीपासून ते प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला. करिअरच्या शिखरावर असतानाही माधुरीने लगेच लग्न करण्याचा विचार का केला, यावर तिने भाष्य केले.

4/9
माधुरी म्हणाली,
माधुरी म्हणाली, "माझे मित्र नेहमी मला सेट अप करण्याचा प्रयत्न करत असत. पण मला माझे करिअर खूप प्रिय होते आणि मला वाटायचे की, जर मला चुकीचा माणूस भेटला, तर माझ्या आयुष्यातील सगळी मजा संपून जाईल. मी कधीही कोणत्याही 'परीकथे'बद्दल विचार केला नव्हता."
advertisement
5/9
माधुरीचे लग्न 'अरेंज्ड' नसून, लव्ह मॅरेज होते, हे तिने स्पष्ट केले. तिच्या भावाने तिची आणि डॉ. नेने यांची भेट घालून दिली होती. पण लगेच लग्न न करता, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी ६ महिने डेट केले होते.

6/9
डॉ. नेने यांच्यातील चांगल्या गोष्टी सांगताना माधुरी म्हणाली,
डॉ. नेने यांच्यातील चांगल्या गोष्टी सांगताना माधुरी म्हणाली, "जेव्हा ते त्यांच्या रुग्णांबद्दल बोलतात, ज्या पद्धतीने ते त्यांच्यासाठी लढतात, त्यांचे ते वागणे अप्रतिम असते. ते नैसर्गिकरित्या खूप काळजी घेणारे, सुशिक्षित आणि बुद्धिमान आहेत. त्यांना फोटोग्राफीमध्येही खूप रस आहे."
advertisement
7/9
माधुरीने डॉ. नेने यांच्यासोबतच्या नात्याला 'कला आणि विज्ञानाचे' सुंदर मिश्रण म्हटले.
माधुरीने डॉ. नेने यांच्यासोबतच्या नात्याला 'कला आणि विज्ञानाचे' सुंदर मिश्रण म्हटले. "मी भाग्यवान आहे की मला इतका रोमँटिक मुलगा मिळाला. आमच्यात परस्पर आदर, धैर्य आणि सकारात्मकता आहे, ज्यामुळे मला नेहमी अधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळते," असे ती म्हणाली.
advertisement
8/9
 "माझे पती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी देणगी आहेत; माझ्या करिअरपेक्षाही मोठी!" असे सांगत तिने आपले प्रेम व्यक्त केले. इतकेच नाही, तर कोविड लॉकडाऊन दरम्यान डॉ. नेने यांनी तिच्या 'कॅन्डल' या म्युझिक व्हिडिओसाठी कॅमेरा तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वतः शूटिंग केले होते.

9/9
माधुरी आणि डॉ. नेने यांनी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्न केले. सध्या ते त्यांची मुलं एरिन आणि रायन यांच्यासोबत मुंबईत स्थायिक झाले असून, माधुरी आता अभिनय क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाली आहे. लवकरच ती 'मिसेस देशपांडे' या सिरीजमध्ये दिसणार आहे.

Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement