जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चित्तोडा येथील शेतकरी युवराज डिघे हे 2010 पासून डाळिंब शेती करतात. परंतु, 2023 मध्ये त्यांनी शरदकिंग वाणाची आपल्या दोन एकर शेतात 8 बाय 14 अंतरावर लागवड केली. सिंगल खोडवा पद्धतीने रोपांची जोपासना केली.
advertisement
यासाठी त्यांना सुरुवातीला 60 ते 70 हजार तर उत्पादन घेण्यासाठी 1 ते 1.20 लाख खर्च आला. योग्य नियोजन केल्याने केवळ 24 महिन्यात त्यांनी डाळिंब बागेवर बहर घेतला. तब्बल 12 टन डाळिंब उत्पादन मिळाले. 151 रुपये प्रति किलो असा जाग्यावरच विक्रमी दर मिळाला. यातून दोनच एकरात 18 लाख रुपये झाले. खर्च वजा केला तर त्यांना 16 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.
आधी माझ्याकडे भगवा जातीचे डाळिंब होते. परंतु, 2023 मध्ये नवीन शरदकिंग वाणाची लागवड केली. योग्य नियोजन केल्यामुळे चांगले उत्पादन मिळाले. एका झाडावर 18 किलो पर्यंत माल निघाला. त्याला जाग्यावर 51 रुपये किलो दर मिळाला. डाळिंब शेती ही इतर पिकांपेक्षा चांगली असल्याचे युवराज डिघे यांनी सांगितले.





