TRENDING:

तुळजाभवानी मंदिरात 1,30,41,00,000 रुपयांचं सोनं, तर 19,58,34,000 रुपयांची चांदी वितळवणार, कारण काय?

Last Updated:
तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यात आलेलं 207 किलो सोनं आणि 2 हजार 570 किलो चांदी वितळवली जाणार आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव)
advertisement
1/6
तुळजाभवानी मंदिरात 1,30,41,00,000 रुपयांचं सोनं वितळवणार, कारण काय?
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं-चांदी वितळवण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2022 पर्यंत 207 किलो सोनं आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली, ते आता वितळवलं जाणार आहे.
advertisement
2/6
सोनं-चांदी वितळवण्यासाठी रुपरेषा आणि दिशा कायम करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सोनं वितळवण्याची नियमावली तयार करण्यासाठी या समितीमधील सदस्य शिर्डी देवस्थानच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. येत्या महिन्यात ही नियमावली तयार होईल.
advertisement
3/6
तब्बल 14 वर्षांनंतर देवीच्या तिजोरीतील सोनं मोजण्यात आलं होतं, त्यानंतर आता ते वितळवले जाणार आहे. सोनं-चांदी वितळवायला विधि व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदिर संस्थानाने प्रक्रियेला सुरूवात केली.
advertisement
4/6
जिल्हाधिकारी तसंच मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी समिती नेमली असून या समितीत 7 सदस्य आहेत. ज्यामध्ये महंत, पुजारी मंडळाचे सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचा समावेश आहे.
advertisement
5/6
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरातसह देशभरातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात. तुळजाभवानी अनेक राजघराण्यांची कुलदेवीही आहे. नवसपूर्ती झाल्यानंतर भक्त देवीला सोनं-चांदीचे दागिने अर्पण करतात.
advertisement
6/6
सोन्याचा हार, मंगळसूत्र, मणी, माळ, डोळे, बांगड्या, मुकूट तसंच चांदीचा पाळणा, समई, सिंहासन, ताट वाटीही देवीसमोर ठेवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
तुळजाभवानी मंदिरात 1,30,41,00,000 रुपयांचं सोनं, तर 19,58,34,000 रुपयांची चांदी वितळवणार, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल