School Holiday: विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर फक्त 12 दिवसच असणार सुट्टी, नेमकं कारण काय?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सध्या शालेय विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहेत. हे पेपर 15 ऑक्टोबरच्या आसपास चालू राहतील. पेपरनंतर मुलांना शाळेला सुट्ट्या मिळतील. या सुट्ट्या 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5

दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सध्या शालेय विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहेत. हे पेपर 15 ऑक्टोबरच्या आसपास चालू राहतील. पेपरनंतर मुलांना शाळेला सुट्ट्या मिळतील. या सुट्ट्या 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत असण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
पण दिवाळीनंतर शालेय विद्यार्थ्यांना अनेक दिवसांच्या सुट्ट्या नसणार आहेत. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 52 रविवार, सण- उत्सव आणि महापुरूषांच्या जयंतीनिमित्त 76 दिवसांच्या सुट्ट्या असतात. तर, 237 दिवस शाळा असते. दरम्यान, यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना 12 दिवसच शाळेला दिवाळीची सुट्टी असणार आहे.
advertisement
3/5
कारण, दिवाळीनंतर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत राज्य भरातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यात राज्यातल्या सर्व शाळेतल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.
advertisement
4/5
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींमुळे शालेय विद्यार्थ्यांना काही दिवसांच्या सुट्ट्या एन्जॉय करायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर काही दिवसांतच सुरू होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 2 मे ते 13 जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. तत्पूर्वी, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील.
advertisement
5/5
दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकल्या जायच्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागायच्या. म्हणजेच परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नसत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यात बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी सुरू होईल, असे आदेश काढले. जेणेकरून शैक्षणिक वर्षातील किमान 220 दिवस तरी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, असा त्यामागील हेतू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
School Holiday: विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर फक्त 12 दिवसच असणार सुट्टी, नेमकं कारण काय?