TRENDING:

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोळ्याची तयारी जोरात, पाहा कुठं भरतोय तान्हा पोळा?

Last Updated:
विदर्भात बैलपोळ्यानंतर मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जातो. इथला तान्हा पोळा प्रसिद्ध आहे.
advertisement
1/9
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोळ्याची तयारी जोरात, पाहा कुठं भरतोय तान्हा पोळा?
बैलपोळा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विदर्भात बैलपोळ्यासोबतच तान्हा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध वेशभुषेतील बालगोपाळ मोठ्या उत्साहात लाकडी नंदीसह हा सण साजरा करतात.
advertisement
2/9
वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील तान्हा पोळा विदर्भात प्रसिद्ध आहे. यंदा 15 सप्टेंबरला तान्हा पोळा साजरा होत आहे. दरवर्षी याठिकाणी पोळ्याला मोठा मेळा भरतो. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून विविध प्रकारचे झुलेही लागत आहेत.
advertisement
3/9
सिंदी रेल्वे येथील मेळा आणि पोळा बघण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून लोक येतात. मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी वेगळाच उत्साह आणि जल्लोष असतो. बालगोपालांसह लाखो नागरिकांना या पोळ्याची उत्सुकता लागली आहे.
advertisement
4/9
तब्बल 141 वर्षांची परंपरा या तान्हा पोळ्याला लाभली आहे. 19 व्या शतकात सुरुवात झालेल्या या सोहळ्याचा डौल आज 21 व्या शतकात अधिकच वाढला आहे.
advertisement
5/9
शहरातील अनेक क्रीडा मंडळे, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्षांच्या शाखांतर्फे विविध समाजप्रबोधत्मक देखावे सादर केले जातात. मानाच्या नंदींसोबत काही सुंदर कलाकृतीही सादर होणार आहेत.
advertisement
6/9
कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात मेळा या ठिकाणी भरणार आहे. यावर्षी 7 पाळणे आणि इतर खेळ असणार आहेत. त्यात आकाश पाळणा, ब्रेक डान्स, टाराटोरा, ड्रॅगन आणि लहान मुलांसाठी छोटे पाळणे आणि खेळ या ठिकाणी लावण्याची तयारी सुरू झाली आहे.
advertisement
7/9
लहान मुलांना या मेळ्यात पाळण्याचे विशेष आकर्षण असते. तसेच सिंदी गावात तान्हा पोळ्याच्या एका रात्रीला जत्रेचे स्वरूप येते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला येतात. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला रोजगार मिळतो.
advertisement
8/9
या तान्हा पोळ्याच्या झाकीमध्ये वेगवेगळे देखावे असतात. तर देवी देवतांच्या किंवा राक्षसाच्या वेशभूषेत तरुण आणि बालगोपाल सजतात.
advertisement
9/9
तान्हा पोळ्या दिवशी मोठ्या आवाजातील डीजे आणि संदल हे सर्वांचे आकर्षण ठरतात. सिंदी गावात मध्यरात्रीपर्यंत मोठ्या उत्साहात पोळा साजरा होत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोळ्याची तयारी जोरात, पाहा कुठं भरतोय तान्हा पोळा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल