Wardha News : वर्ध्यात भाविकांच्या धावत्या ट्रॅव्हलरला आग! काही मिनिटांत जळून कोळसा; काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हलरला आग लागल्याने भीषण अपघात घडला आहे. (नरेंद्र मते, प्रतिनिधी)
advertisement
1/5

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हलरला आग लागल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये गाडीचा जळून कोळसा झाला आहे.
advertisement
2/5
कारंजा घाडगे जवळील पालोरा येथील पेट्रोलपंप जवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त ट्रॅव्हल शेगाव येथून दर्शन करून नागपूरला चालली होती.
advertisement
3/5
या ट्रॅव्हलमध्ये एकूण 17 भाविक प्रवास करत होते. गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली.
advertisement
4/5
वाहन थांबवताच प्रवासी तात्काळ बाहेर पडले. काही वेळेतच संपूर्ण ट्रॅव्हलला आग लागली. प्रसांगवधान राखल्याने जीवितहानी टळली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
advertisement
5/5
तापमानात वाढ झाल्याने वाहनात आग लागल्याच्या घटना घडत आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यात 4 ठिकाणी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha News : वर्ध्यात भाविकांच्या धावत्या ट्रॅव्हलरला आग! काही मिनिटांत जळून कोळसा; काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS