वर्ध्यातील या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच झालं होतं ध्वजारोहण, जंगल सत्याग्रहाशी आहे संबंध PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
वर्ध्यातील या गावात स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच ध्वज फडकाविण्यात आला होता.
advertisement
1/6

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव श्या.पं. हे गाव श्यामजीपंत महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे. गावाचा लागूनच गारगोटीचा माथा आणि गावा लागत दत्तात्रय मंदिर आहे. या दत्तात्रय मंदिराच्या लगत प्रथमच 1930 नंतर 87 वर्षांनंतर आणि स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच ध्वज फडकाविण्यात आला होता.
advertisement
2/6
या ऐतिहासिक प्रसंगाचा मान माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता होले यांना मिळाला होता. नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने 1930 मध्ये प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून तळेगावची निवड केली होती.
advertisement
3/6
1 आॅगस्ट 1930 रोजी तळेगाव शामजी पंत येथील गडावर 30 हजार स्वयंसेवक आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपतराव टिकेकर आणि श्रीधरराव दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. शेकडो कार्यकर्त्यांना इंग्रजांनी अटक सुद्धा केली होती. हे आंदोलन वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून राज्य गॅझेटीअर बुकमध्ये तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद सुद्धा करण्यात आली असल्याचं सांगण्यात येते.
advertisement
4/6
जंगल सत्याग्रह आणि इतिहासातील तळेगावचे महत्त्व याबाबत मागील अनेक वर्षांपासून सत्याग्रह स्मारक समिती संशोधन करीत आहे. अशा प्रकारे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे 1930 चा जंगल सत्याग्रह झाल्याची शासन दरबारी नोंद सुद्धा आहे.
advertisement
5/6
2018 यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अभियान चालवलं गेलं होतं. ज्यात ज्या ज्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्याचा लढा झालेला आहे आणि तिथे अजूनही भारतीय ध्वज फडकवला गेला नाही अशा ठिकाणांना शोधून ध्वजारोहण करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होतं.
advertisement
6/6
त्यानुसार तळेगाव येथे ध्वजारोहण करण्यात आलं आणि हा इतिहास रचला गेला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन होले यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
वर्ध्यातील या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच झालं होतं ध्वजारोहण, जंगल सत्याग्रहाशी आहे संबंध PHOTOS