Weather Update: समुद्र खवळला, वारं फिरलं आता 5 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम, या जिल्ह्यांसाठी अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरबी समुद्र, पश्चिम बंगाल, विदर्भ, कोकण, रत्नागिरी, जळगाव, भंडारा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, वाशीम, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट.
advertisement
1/6

अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे विदर्भासोबत कोकण किनारपट्टीवर भागात पाऊस कायम आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
advertisement
2/6
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रत्नागिरी, जळगाव, भंडाऱ्यात मोठं नुकसान झालं आहे. पिक काढल्यानंतर पाऊस आल्यानं शेतात काढून ठेवलेलं पिक पाण्याखाली गेलं आहे.
advertisement
3/6
विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/6
अकोला, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 48 तास महत्त्वाचे असणार आहेत. वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
5/6
मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. आता ते कमजोर होत असून डिप डिप्रेशनमध्ये जात आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या समुद्रात सध्या वारे फिरत आहेत. त्यामुळे पुढचे 48 तास हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
advertisement
6/6
31 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून पावसाचा जोर कमी होईल. हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. मच्छिमारांना खोल समुद्रान न जाण्याचं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: समुद्र खवळला, वारं फिरलं आता 5 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम, या जिल्ह्यांसाठी अलर्ट