Konkan Weather Update: मुंबईत हलक्या पावसाची शक्यता, कोकणात विजा कडाडणार, यलो अलर्ट!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
Mumbai Weather Forecast: राज्यात यंदा आगमनापासून मान्सूननं चांगलाच धुमाकूळ घातला. परतीच्या पावसानंही झोडपून काढलं. आता मात्र पाऊस राज्यातून परतणार असं म्हटलं जातंय खरं, मात्र जाता जाताही अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/5

यंदा पावसानं सुरुवातीलाच मुंबईकरांचं मोठं नुकसान केलं. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून भयंकर दुर्घटना घडली होती, अनेकजणांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर विश्रांती घेऊन घेऊन मुंबईत पाऊस जोरदार कोसळला.
advertisement
2/5
आता आज 23 ऑक्टोबर रोजी हवामान विभागानं मुंबई, ठाण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर, काही भागांमध्ये मात्र उष्णता वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/5
कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम असेल.
advertisement
4/5
कोकणात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/5
गुरुवार, 24 ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. परंतु पुढचे काही दिवस वातावरण ढगाळ असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Konkan Weather Update: मुंबईत हलक्या पावसाची शक्यता, कोकणात विजा कडाडणार, यलो अलर्ट!