Weather update: स्वेटर नाही तर छत्री काढा! 50 किमी सोसाट्याचा वारे, मेघगर्जनेसह या जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरबी समुद्रातील डिप डिप्रेशन, ला निना आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूरमध्ये यलो अलर्ट, डिसेंबरमध्ये तीव्र थंडीची शक्यता.
advertisement
1/7

दिवाळी संपली आणि नोव्हेंबर आला तरी स्वेटर नाही तर अजूनही छत्री काढण्याची वेळ आली आहे. पाऊस ख्रिसमस करुनच जातो की काय अशी शंका वाटू लागली आहे. यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत.
advertisement
2/7
अरबी समुद्रातील सक्रिय प्रणाली आणि उत्तरेकडील वातावरणीय बदलांमुळे थंडीचे आगमन उशिरा होणार असले तरी, यंदाचा हिवाळा गेल्या २५ वर्षांच्या तुलनेत तीव्र असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
अरबी समुद्रातील 'डिप डिप्रेशन': ही प्रणाली गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. उत्तरेकडील 'सायक्लोनिक सर्क्युलेशन': ही स्थिती ३ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या भागांमध्ये तयार होत आहे. 'ला निना'चा परिणाम: प्रशांत महासागरात 'ला निना'ची स्थिती कायम असल्यामुळे या हवामान बदलांची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
advertisement
4/7
या बदलांमुळे राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहील, तसेच पावसाचा शिडकावा पाहायला मिळेल. राज्यात ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
सिंधुदुर्ग, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या काळात या पट्ट्यात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. उर्वरित ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहील. विशेष म्हणजे, ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी विदर्भात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
6/7
राज्यात बहुतेक ठिकाणी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अपवाद म्हणून, पूर्व भारत आणि उत्तर प्रदेश, बिहारमधील काही भागांत ते सरासरीपेक्षा जास्त असू शकते. राज्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता, इतरत्र रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे.
advertisement
7/7
थोडक्यात, ढगाळ वातावरण आणि रात्रीचे तापमान जास्त राहिल्यामुळे सध्या थंडीची चाहूल लागण्यास वेळ लागेल. मात्र, 'ला निना'च्या स्थितीमुळे थंडी उशिरा आली तरी डिसेंबरमध्ये ती तीव्र असेल, असा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather update: स्वेटर नाही तर छत्री काढा! 50 किमी सोसाट्याचा वारे, मेघगर्जनेसह या जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट