Weather Update : बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Weather Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे
advertisement
1/6

गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात बळीराजा चिंतेत आहे. मात्र आता पाऊस पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/6
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत.
advertisement
3/6
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे
advertisement
4/6
विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे.
advertisement
5/6
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पुण्यासह नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
6/6
भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरकरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही दोन दिवस पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाने म्हटलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, या ठिकाणी ऑरेंज अलर्ट