TRENDING:

Indian Bull Market: ही मस्करी नाही ना चेष्टा, 1 लाखाचे झाले 81 लाख; आयुष्य बदलून टाकणारे 444 Shares, ज्यांनी सोडला...

Last Updated:
Indian Bull Market: फोर्स मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना अविश्वसनीय परतावा देत 1 लाख रुपयांची गुंतवणूक तब्बल 81 लाखांवर नेली आहे. सलग चौथे वर्ष मल्टीबॅगर ठरलेल्या या शेअरने 8,000% वाढ नोंदवत बाजारातील सर्वात मोठ्या वेल्थ-क्रिएटर्सपैकी एक म्हणून स्थान मिळवले आहे.
advertisement
1/7
ही मस्करी नाही ना चेष्टा, 1 लाखाचे झाले 81 लाख; आयुष्य बदलून टाकणारे 444 Shares
फोर्स मोटर्स या छोट्या परंतु दमदार शेअरने गुंतवणूकदारांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. या कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्याइतका प्रचंड परतावा दिला आहे. फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज तब्बल 81 लाखांवर पोहोचली असून, सलग चौथ्या वर्षी मल्टीबैगर परतावा मिळवून देत हा शेअर बाजारातील सर्वात मोठ्या वेल्थ–क्रिएटर्सपैकी एक ठरला आहे. गुंतवणुकीच्या वेगवान जगात असे शेअर्स विरळच मिळतात, पण फोर्स मोटर्सने गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे. त्यामुळे हा शेअर गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरला.
advertisement
2/7
कंपनी अनेक वर्षे दबावाखाली राहिल्यानंतर जोरदार पुनरागमन करत सर्व नुकसान भरून काढत वर आली. विशेष म्हणजे या शेअरने खालच्या स्तरातही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची क्षमता दाखवून दिली. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ या शेअरमुळे अक्षरशः झळाळून निघाले आहे.
advertisement
3/7
कंपनी काय करते? फोर्स मोटर्स ही पूर्णपणे एकीकृत ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे. वाहनांचे डिझाइन, विकास आणि मॅन्युफॅक्चरिंग या सर्व क्षेत्रांत कंपनीला विशेष प्राविण्य प्राप्त आहे. कंपनी LCV, MUV, SCV, SUV आणि कृषी ट्रॅक्टर्सच्या उत्पादनात आघाडीवर आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 164% वाढ झाली असून दोन वर्षांच्या कालावधीत शेअरने 340% परतावा दिला आहे.
advertisement
4/7
शेअर प्राइस हिस्ट्री फोर्स मोटर्सच्या शेअर्सने मागील पाच वर्षांपैकी चार वर्षांत सकारात्मक परतावा नोंदवला आहे. 2025 मध्ये तर हा शेअर आधीच 181% वर गेला असून, पहिल्यांदाच 21,999 च्या पातळीवर पोहोचत नवा विक्रम केला आहे. बाजारातील चढउतारांमध्येही या शेअरने केलेल्या कामगिरीमुळे तो निफ्टी 500 मधील उत्कृष्ट परफॉर्मर्सपैकी एक बनला आहे.
advertisement
5/7
भव्य दीर्घकालीन वाढ 2013 मध्ये या शेअरची किंमत 225 इतकी होती. आज ती सुमारे 18,289 झाली आहे. म्हणजे तब्बल ८,०००% वाढ. या दरम्यान या शेअरने चार वेळा (2015 मध्ये – 188%, 2014 मध्ये – 187%, 2023 मध्ये – 161%) मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
advertisement
6/7
कंपनीची आर्थिक स्थिती कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये सातत्याने सुधारणा होत असल्यामुळे शेअरची मागणी वाढत आहे. Q2 FY26 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 159% वाढून 350.6 कोटी झाला. महसूल YoY आधारावर 7.2% वाढून 2,081 कोटी झाला. EBITDA 362.1 कोटी इतका नोंदला गेला (28.3% वाढ). मार्जिन 14.5% वरून 17.4% पर्यंत वाढले. नोव्हेंबरमध्ये कंपनीची डिलर विक्री 32% ने वाढून 2,835 युनिट्सवर पोहोचली. घरेलू विक्रीत 35% वाढ, तर निर्यातीत थोडी घट दिसली.
advertisement
7/7
12 वर्षांत 1 लाख रुपयांचे 81 लाख! 2013 मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीचे 1 लाखांचे शेअर्स घेतले असते तर त्यासाठी 444 शेअर्स मिळाले असते, तर आज त्यांची किंमत 81.20 लाख झाली असती. हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे आणि योग्य निर्णयाचे अचूक उदाहरण ठरते, ज्याला 'वेल्थ मल्टिप्लायर इफेक्ट' म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Indian Bull Market: ही मस्करी नाही ना चेष्टा, 1 लाखाचे झाले 81 लाख; आयुष्य बदलून टाकणारे 444 Shares, ज्यांनी सोडला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल