Gold Rate: खूशखबर! 3 दिवसांत 4800 रुपयांनी स्वस्त, आज तोळ्याला किती मोजावे लागणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने घट होतेय. नाशिक सराफा बाजारात सोनं पुन्हा स्वस्त झालंय.
advertisement
1/5

गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढउतार होत आहेत. एक लाखांच्या पार गेलेल्या सोन्याच्या दरांत पुन्हा मोठी घट झालीये. सध्याच्या आठवड्यात जवळपास 5 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
2/5
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असताना गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली होती. नाशिक सराफा बाजारात सोनं एक लाखांच्या घरात गेलं होतं. परंतु, सोमवारपासून सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण सुरू झाली. आता 3 दिवसांत 4 हजार 800 रुपयांनी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं स्वस्त झालंय.
advertisement
3/5
नाशिक सराफा बाजारात आज 400 रुपये प्रतितोळा प्रमाणे सोनं स्वस्त झालं. त्यामुळे आता 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 93 हजार 800 रुपये मोजावे लागतील. तर तेवढ्याच मोडीसाठी 90 हजार 986 रुपये मिळतील. 22 कॅरेटच्या दागिन्यांसाठी प्रतितोळा 85 हजार 921 रुपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेट मोडीस तुम्हाला 83,343 रुपये मिळणार आहेत.
advertisement
4/5
सोन्याच्या भावासोबत आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. चांदीच्या किंमतीत 1000 रुपयांची घसरण होऊन आजचे दर 96,500 वर येऊन थाबंले आहेत. त्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.
advertisement
5/5
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर होत आहे. अमेरिकेचे टॅरिफ धोरणामुळे सोनं महागलं होतं. परंतु, आता पुन्हा यातून मार्ग निघत असल्याने सोन्याच्या दरांत घट होतेय. तरीही गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate: खूशखबर! 3 दिवसांत 4800 रुपयांनी स्वस्त, आज तोळ्याला किती मोजावे लागणार?