TRENDING:

नारायण मूर्तींनी 4 महिन्यांच्या नातवाला दिले 15 लाख शेअर्स, पाळण्यात बसल्या बसल्या कसा मिळाला 3.3 कोटींचा डिव्हिडंट

Last Updated:
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र, १७ महिन्यांत ३.३ कोटींचा मालक झाला आहे. नारायण मूर्ती यांनी त्याला १५ लाख शेअर्स दिले होते.
advertisement
1/7
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र कोट्यवधींचा मालक
एखाद्याचं नशीब त्याच्या पाळण्यातच उजळतं, हे खरं आहे! इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा दीड वर्षाचा नातू 'एकाग्र' अवघ्या १७ महिन्यांत कोट्यवधींचा मालक झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इन्फोसिसच्या तिमाही निकालांमध्ये मिळालेल्या लाभांशामुळे एकाग्रला तब्बल ३.३ कोटी रुपयांचा धनवर्षाव झाला आहे.
advertisement
2/7
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र कोट्यवधींचा मालक
एकाग्र हा रोहन मूर्ती यांचा मुलगा आणि नारायण मूर्ती यांचा नातू आहे. एकाग्र अवघा चार महिन्यांचा असताना नारायण मूर्ती यांनी त्याला इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स भेट दिले होते. आज या शेअर्सचे मूल्य सुमारे २१४ कोटी रुपये आहे.
advertisement
3/7
इन्फोसिसने अलीकडेच एका शेअरवर २२ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. त्यानुसार, एकाग्रच्या नावावर असलेल्या १५ लाख शेअर्सवर त्याला एकट्या या तिमाहीत ३.३ कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लाभांशातून एकाग्रला ७.३५ कोटी रुपये मिळाले होते.
advertisement
4/7
लाभांशाच्या या वितरणात मूर्ती कुटुंबीयांचीही मोठी कमाई झाली आहे, अवघ्या दीड वर्षात हा चिमुकला कोट्यवधी रुपयांचा मालक झाला आहे. एकूण मिळकत गेल्या १२ महिन्यांत १०.६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
advertisement
5/7
लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख ३० मे २०२५ ठेवण्यात आली असून, पेमेंट ३० जून रोजी केलं जाणार आहे. सध्या ही रक्कम बँक खात्यांमध्ये थेट ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.
advertisement
6/7
या पेमेंटसह चालू आर्थिक वर्षासाठी त्यांची एकूण लाभांश उत्पन्न 10.65 कोटी रुपये झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याला कंपनीने जाहीर केलेल्या अंतरिम लाभांशाद्वारे 7.35 कोटी रुपये मिळाले होते.
advertisement
7/7
मूर्ती कुटुंबातील इतर अनेक सदस्य- जे इन्फोसिसच्या प्रवर्तक गटाचे सदस्य आहेत. त्यांनाही लाभांशातून चांगली रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये खुद्द नारायण मूर्ती यांना 33.3 कोटी रुपये मिळतील. तर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना 76 कोटी आणि मुलगी अक्षता मूर्ती यांना 85.71 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
नारायण मूर्तींनी 4 महिन्यांच्या नातवाला दिले 15 लाख शेअर्स, पाळण्यात बसल्या बसल्या कसा मिळाला 3.3 कोटींचा डिव्हिडंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल