TRENDING:

Stock Market Crash: IT ला व्हायरस, ऑटोला ब्रेक, कुठपर्यंत घसणार हे शअर्स, समोर आली महत्त्वाची माहिती

Last Updated:
फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. BSE Sensex 1000 अंकांनी आणि Nifty 50 300 अंकांनी घसरला. IT आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण.
advertisement
1/7
IT ला व्हायरस, ऑटोला ब्रेक, कुठपर्यंत घसणार हे शअर्स, समोर आली महत्त्वाची माहित
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडाले. सकाळच्या पहिल्या तासाभरातच BSE Sensex 1000 अंकांनी तर Nifty 50 ने 300 अंकांनी घसरला. याचा परिणाम IT आणि ऑटो क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांवर झाला आहे.
advertisement
2/7
IT क्षेत्रातील शेअर्सनी मोठी घसरण घेतली आहे. Nifty IT इंडेक्समधील सर्व 10 शेअर्स लाल झाले आहेत. Persistent Systems चे शेअर्स 5.21% ने कोसळले. Tech Mahindra ने 4.94% घसरण घेतली. Coforge 4.60%, Mphasis 4.54%, आणि Wipro 4.11% नी घसरले आहेत. HCL Tech आणि TCS सारख्या मोठ्या कंपन्यांनीही आपली किंमत गमावली आहे.
advertisement
3/7
ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. Mahindra & Mahindra मध्ये सर्वाधिक 4.91% ची घसरण झाली. Ashok Leyland, Maruti Suzuki, TVS Motors, आणि Bharat Forge सारख्या कंपन्यांचे शेअर्सही 3% ते 4% ने कमी झाले. Tata Motors 2.56% ने तर Bajaj Auto 1.95% नी कोसळले आहे.
advertisement
4/7
Bank Nifty मध्ये 0.90% ची घसरण झाली आहे. Nifty Metal आणि Nifty Pharma इंडेक्समध्येही अनुक्रमे 1.97% आणि 1.76% ची घसरण झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्समध्ये 2.08% आणि प्रायव्हेट बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
advertisement
5/7
या घसरणीमुळे BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 6.64 लाख कोटी रुपयांनी घटले आहे. एकूण 590 शेअर्स त्यांच्या एका वर्षातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले आहेत.
advertisement
6/7
शेअर मार्केटमधील ही मोठी घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. पुढील काही दिवस बाजार काय मोड घेतो हे पाहावं लागणार आहे.
advertisement
7/7
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअरचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. शेअरमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Stock Market Crash: IT ला व्हायरस, ऑटोला ब्रेक, कुठपर्यंत घसणार हे शअर्स, समोर आली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल