रॉकेट शेअर्स: मार्केट कोसळलं तरी 1 महिन्यात 5 शेअर्सने दिले जबरदस्त रिटर्न, तुमच्या लिस्टमध्ये आहेत का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मंगळवारी थोडासा रिकव्हरी दिसली, तरीही अनेक शेअर्स अजूनही लाइफटाइम लो वर आहेत. पण या मंदीच्या वातावरणातही काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिले आहेत. आज आपण अशाच काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
advertisement
1/7

मुंबई: मागच्या नऊ महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांचे कधी 2 लाख कोटी तर कधी 16 लाख कोटी बुडत आहेत. सततच्या घसरणीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे लोक पैसे काढून घ्यावे की नाही याबाबत साशंक आहेत. मात्र या क्रेश झालेल्या मार्केटमध्ये देखील 5 कंपन्यांचे शेअर्स मात्र मागच्या 1 महिन्यांपासून रॉकेटच्या वेगानं सुसाट रिटर्न्स देत आहेत.
advertisement
2/7
गॉडफ्रे फिलिप्स- गॉडफ्रे फिलिप्स या कंपनीच्या शेअरने गेल्या महिन्यात 30.42% ची वाढ नोंदवली आहे. मंगळवारी हा शेअर 5,667.75 रुपयांवर बंद झाला. बाजारातील अस्थिरतेनंतरही या शेअरने चांगला रिटर्न दिला.
advertisement
3/7
गोदरेज इंडस्ट्रीज- गोदरेज इंडस्ट्रीजच्या शेअरने देखील उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरची किंमत 33.33% ने वाढली आहे. 25 फेब्रुवारी रोजी हा शेअर 1,119 रुपयांवर बंद झाला. गुंतवणूकदारांना या शेअरमधून चांगला रिटर्न मिळत आहे.
advertisement
4/7
आरती फार्मालॅब्स- आरती फार्मालॅब्सच्या शेअरने गेल्या महिन्यात 29.29% ची वाढ दर्शवली आहे. मंगळवारी या शेअरची किंमत 771.95 रुपयांवर बंद झाली. फार्मा सेक्टरमधील या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे.
advertisement
5/7
कॅस्ट्रोल इंडिया- कॅस्ट्रोल इंडियाच्या शेअरने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात या शेअरची किंमत 28.19% ने वाढली आहे. मंगळवारी हा शेअर 217.33 रुपयांवर बंद झाला. ऑटोमोबाईल आणि लुब्रिकेंट्स क्षेत्रातील या शेअरला चांगली मागणी आहे.
advertisement
6/7
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स- ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्सच्या शेअरने देखील चांगली कामगिरी केली आहे. या शेअरची किंमत 23.89% ने वाढली आहे. मंगळवारी हा शेअर 2,555 रुपयांवर बंद झाला. औषधनिर्मिती क्षेत्रातील या शेअरला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
7/7
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
रॉकेट शेअर्स: मार्केट कोसळलं तरी 1 महिन्यात 5 शेअर्सने दिले जबरदस्त रिटर्न, तुमच्या लिस्टमध्ये आहेत का?