TRENDING:

Share Market: स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये फरक काय?

Last Updated:
स्मॉल कॅप आणि मिड कॅप मार्केट कोसळले आहेत, तर लार्ज कॅप आणि मल्टिबैगर स्टॉक्स चांगले रिटर्न्स देत आहेत.
advertisement
1/7
स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक कशी करावी?
सध्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप मार्केट खूप जास्त कोसळलं आहे. लार्ज कॅप आणि मल्टिबैगर स्टॉक्स मागच्या 6 महिन्यात चांगले रिटर्न्स देत आहेत. आपल्या कानावर नेमकी स्मॉल, लार्ज आणि मिड कॅपचे फंड्स येत असतात. NSE आणि BSE मध्ये काय फरक आहे ते सोप्या भाषेत समजून घेतलं. आता शेअर मार्केटमधील आणखी एक महत्त्वाची टर्म सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
2/7
स्मॉल कॅप स्टॉकचं मार्केट कॅप छोटं असतं. साधारणपणे 5000 कोटींपेक्षा ज्या कंपन्यांचं मार्केटकॅप कमी आहे, त्या कंपन्या स्मॉलकॅपमध्ये येतात. त्या कंपन्यांचे शेअर तुम्ही स्मॉल कॅपमधून खरेदी करू शकता.
advertisement
3/7
या काही स्टार्टअप कंपन्यांचाही समावेश असतो. स्मॉल कॅप शेअर्समध्ये जास्त रिस्क असते, शेअर्सच्या किंमती वेगानं वाढतात आणि कमी कालावधीत जास्त रिटर्न देतात. सध्याची स्थिती पाहता स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये जास्त अस्थिरता आहे. इथल्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत.
advertisement
4/7
मिड कॅप स्टॉक्स 5000 कोटी ते 20 हजार कोटींच्या आतमध्ये असते. इथे लिस्टे़ड झालेल्या कंपन्यांचे शेअर्स संतुलित आणि स्थिर ग्रोथ देतात. त्यामुळे बरेचदा इथे रिस्क स्मॉल कॅपपेक्षा कमी असते. मात्र लार्ज कॅपपेक्षा धोका इथेही जास्तच असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना कंपन्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं.
advertisement
5/7
लार्ज कॅपमध्ये ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप 20 हजार कोटींहून अधिक आहे त्या कंपन्यांच्या नावांचा समावेश होतो. या कंपन्या भरवशाच्या असतात. इथे स्मॉल आणि मिड कॅपपेक्षा ग्रोथ चांगली असते मात्र त्यासाठी दीर्घमुदतीवर पैसे गुंतवण्याची तयारी ठेवावी लागते. लार्जकॅपमध्ये स्थिरता जास्त असते आणि रिटर्न्सही चांगले मिळतात.
advertisement
6/7
लार्जकॅपमध्ये काहीवेळा कासवाच्या गतीनंही ग्रोथ होण्याचा चान्स असतो. त्यामुळे साधारणपणे मागच्या पाच वर्षांचा अभ्यास करुन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी पैसे ठेवणं फायदेशीर ठरू शकते.
advertisement
7/7
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market: स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉकमध्ये फरक काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल