TRENDING:

TATA च्या या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा धक्का, 2 लाख कोटी बुडाले

Last Updated:
टाटा मोटर्सच्या शेअर्सची या वर्षी आतापर्यंत कामगिरी सर्वात वाईट कामगिरी मार्केटमध्ये पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स धाडकन आपटले. कंपनीचा शेअर सर्वात वाईट कामगिरी करणारा निफ्टी 50 स्टॉक म्हणून ओळखला जात आहे.
advertisement
1/7
टाटा मोटर्स शेअर्समध्ये 44% घसरण, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 2 लाख कोटी बुडाले
नुकतंच टाटाच्या एका कंपनीचा आयपीओ येणार असल्याची मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली, तर दुसरीकडे टाटाच्या दुसऱ्या एका कंपनीचे शेअर्स अर्ध्या किंमतीपेक्षा जास्त पटीनं आपटले. त्याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. टाटा शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
टाटा मोटर्सच्या शेअर्सची या वर्षी आतापर्यंत कामगिरी सर्वात वाईट कामगिरी मार्केटमध्ये पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स धाडकन आपटले. कंपनीचा शेअर सर्वात वाईट कामगिरी करणारा निफ्टी 50 स्टॉक म्हणून ओळखला जात आहे.
advertisement
3/7
जुलै २०२४ मधील हाच स्टॉक रॉकेटच्या स्पीडने वाढत 1,179 रुपयांवर पोहोचला, तो तिथून 44 % घसरून सध्या 661.75 रुपयांवर आला आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1.9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
4/7
चीन आणि यूके सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची कमकुवत मागणी तसेच युरोपियन बनावटीच्या कारवरील संभाव्य यूएस आयात शुल्काबद्दलच्या चिंतेमुळे शेअर्समध्ये घसरण झाल्याची चर्चा आहे.
advertisement
5/7
JLR ची कमकुवत मागणी आणि M&HCV आणि EV विभागातील देशांतर्गत विक्रीच्या चिंतेमुळे टाटा मोटर्सचे शेअर्स 44 % ने घसरले आहेत. कंपनी अल्पकालीन आव्हानांना तोंड देत असली तरी, विश्लेषकांना 930-935 रुपयांपर्यंत या शेअर्सचं टार्गेट दिलं आहे.
advertisement
6/7
देशांतर्गत ऑटोमोबाईल उत्पादक टाटा मोटर्सचा एकत्रित निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 22 टक्क्यांनी घसरून 5,578 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने अलीकडेच ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 7,145 कोटी रुपयांचा एकात्मिक निव्वळ नफा नोंदवला होता.
advertisement
7/7
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
TATA च्या या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा धक्का, 2 लाख कोटी बुडाले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल