Trump Tariff Impact on Share Market:Tariff Impact: 1000 की 2000 किती अंकांनी कोसळणार शेअर मार्केट? कोणत्या सेक्टरला बसणार मोठा फटका?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Trump Tariff Impact on Share Market: अमेरिकेकडून टेरिफचा दणका! भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण? ही गुंतवणुकीसाठी संधी की सर्वात मोठा धोका, एक्सपर्ट काय म्हणाले जाणून घ्या.
advertisement
1/9

मुंबई: ज्याची भीती होती अखेर तेच घडलं आहे. अमेरिकेच्या एक निर्णयामुळे ट्रेड वॉर होण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्रचंड दबाव आहे. आधीच शेअर मार्केट कोसळलेलं असताना आता पुन्हा एकदा अमेरिकेनं दणका दिला आहे. टेरिफमुळे शेअर मार्केट आज मोठ्या अंकांनी कोसळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/9
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या टैरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आशियाई बाजारात आधीच मोठी अस्थिरता दिसत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 4% पडला आहे, तर गिफ्ट निफ्टीदेखील 1.5% नी घसरला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार आज मोठ्या घसरणीसह उघडण्याची चिन्हं आहेत.
advertisement
3/9
शेअर बाजारात मोठी घसरण?- 2 एप्रिल रोजी ट्रंप यांनी नव्या टेरिफ रेट्सची घोषणा केली, त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. डाऊ फ्युचर्स 2% नी खाली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता वाढली आहे.
advertisement
4/9
तज्ज्ञांच्या मते, भारतीय बाजारही याच्या प्रभावाखाली राहू शकतो. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये 1000-2000 प्वाइंटपर्यंत घसरण होण्याचा अंदाज आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही पैसे गुंतवण्यासाठी संधी असली तरी मोठी जोखीम आहे. त्यामुळे अलर्ट मोडवर राहाणं गरजेचं आहे.
advertisement
5/9
डॉलर वधारला, बॉण्ड मार्केटमध्ये तेजी- बॉण्ड मार्केटमध्ये तेजी असून डॉलरही मजबूत झाला आहे. हे बाजारासाठी चांगले संकेत नाहीत. डॉलर वधारल्याने विदेशी गुंतवणुकीला फटका बसू शकतो, परिणामी भारतीय शेअर्सवर दबाव वाढेल.
advertisement
6/9
ग्लोबल ट्रेड वॉरची भीती वाढली- ट्रंप यांनी जाहीर केलेल्या टैरिफमुळे जागतिक व्यापारयुद्धाची शक्यता वाढली आहे. भारतावर आता 26% टैरिफ लागू करण्यात आला आहे.
advertisement
7/9
ट्रंप म्हणाले, "भारत आमच्यासोबत योग्य वागणूक देत नाही. पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण भारत आम्हाला 52% कर लावतो, तर आम्ही जवळपास काहीच लावत नाही." यामुळे भारत-अमेरिका व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
8/9
कोणत्या सेक्टरला सर्वाधिक फटका?- या टैरिफमुळे ऑटोमोबाईल, टेक्सटाइल, डायमंड आणि फार्मा यासारख्या उद्योगांवर परिणाम होईल. या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली येऊ शकतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून येईल.
advertisement
9/9
शेअर बाजारात पुढे काय?- भारतीय गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. बाजारात मोठी घसरण झाल्यास खरेदीची संधी मिळू शकते. मात्र, जागतिक घडामोडींवर नजर ठेवणं आवश्यक आहे. आता बाजाराची वाटचाल कोणत्या दिशेने जाते हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Trump Tariff Impact on Share Market:Tariff Impact: 1000 की 2000 किती अंकांनी कोसळणार शेअर मार्केट? कोणत्या सेक्टरला बसणार मोठा फटका?