TRENDING:

AC सर्विसच्या नावाखाली तुमची लूट तर होत नाही ना? गॅस भरण्यापासून ते जेट वॉशपर्यंत; जाणून घ्या मार्केटचे खरे रेट

Last Updated:
Split AC service : एसी सर्विसिंगच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी आम्ही हा विशेष रिपोर्ट तयार केला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात खिशाला गरम चटका बसू नये, असं वाटत असेल तर एसी सर्विसिंगचे हे मार्केट रेट्स एकदा नीट समजून घ्या.
advertisement
1/8
AC सर्विसच्या नावाखाली तुमची लूट तर होत नाही ना? गॅस भरण्यापासून ते जेट वॉशपर्यंत; जाणून घ्या मार्केटचे खरे रेट
मार्च महिना अर्धा सरला की सूर्याचा कडाका जाणवू लागतो आणि घरोघरी एका उपकरणाची चर्चा सुरू होते, ते म्हणजे 'एअर कंडिशनर' (AC). वर्षभर शांत असलेला आपला लाडका एसी आता पुन्हा एकदा थंडगार हवा देण्यासाठी सज्ज झाला असेल. पण, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण धावपळ करतो ती एसी सर्विसिंगसाठी. अनेकदा आपण एखाद्या टेक्निशिअन किंवा सर्विसिंग वाल्याला बोलावतो आणि तो मग गॅस कमी झालाय किंवा कॉइल खराब झालीय असं सांगून हजारो रुपयांचं बिल हातात टेकवतो. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की, नक्की या कामाचे खरे दर काय आहेत?
advertisement
2/8
तुमची हीच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आणि एसी सर्विसिंगच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी आम्ही हा विशेष रिपोर्ट तयार केला आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात खिशाला गरम चटका बसू नये, असं वाटत असेल तर एसी सर्विसिंगचे हे मार्केट रेट्स एकदा नीट समजून घ्या.
advertisement
3/8
1. स्प्लिट एसी (Split AC) सर्विसिंगचे दरस्प्लिट एसीमध्ये इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन युनिट्स असतात, त्यामुळे याची सर्विस थोडी खर्चिक असू शकते.साधारण सर्विस: फिल्टर आणि बेसिक साफसफाईसाठी 500 ते 1,000 रुपये खर्च येतो.जेट वॉश (Deep Cleaning): जर दोन्ही युनिट्स प्रेशर गनने खोलवर स्वच्छ करायचे असतील, तर 900 ते 1,500 रुपये आकारले जातात.केवळ पाणी गळती रोखण्यासाठी पाईप साफ करायचा असेल, तर 200 ते 500 रुपये लागतात.
advertisement
4/8
2. विंडो एसी (Window AC) सर्विसिंग : किती स्वस्त?विंडो एसीची रचना सोपी असल्याने त्याचे दर स्प्लिट एसीच्या तुलनेत कमी असतात.बेसिक सर्विस: जनरल क्लिनिंगसाठी साधारण 400 ते 700 रुपये लागतात.डीप क्लिनिंग: पूर्ण युनिट बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी 700 ते 1200 रुपये खर्च येतो.
advertisement
5/8
3. सर्वात मोठा खर्च गॅस रिफिलिंगएसी थंड हवा देत नसेल, तर तंत्रज्ञ सर्वात आधी गॅस भरण्याचा सल्ला देतात. गॅसचे दर त्याच्या प्रकारावर अवलंबून असतात:R22 गॅस: 1800 ते 2500 रुपये.R410A गॅस: 2500 ते 3500 रुपये.R32 गॅस: 2500 ते 3800 रुपये.(टीप: एसीची क्षमता (टन) आणि मॉडेलनुसार हे दर थोडे बदलू शकतात.)
advertisement
6/8
4. स्पेअर पार्ट्स आणि दुरुस्तीचा खर्चजर तुमच्या एसीमध्ये काही बिघाड असेल, तर अंदाजे खर्च असा असू शकतोकॅपेसिटर बदलणे 300 ते 900 रुपये.फॅन मोटर दुरुस्ती/बदलणे 1,500 ते 3,000 रुपये.PCB रिपेअरिंग 2,000 ते 5,000 रुपये.कम्प्रेसर 5,000 ते 1,200 रुपये (ब्रँडनुसार).
advertisement
7/8
5. फसवणूक टाळण्यासाठी 'या' 4 गोष्टी लक्षात ठेवा1. आधी दर विचारा: काम सुरू करण्यापूर्वी व्हिजिटिंग चार्जेस आणि एकूण कामाचा अंदाजे खर्च लेखी किंवा स्पष्टपणे विचारून घ्या.2. फिल्टर स्वतः साफ करा: दर 15-20 दिवसांनी एसीचे फिल्टर तुम्ही स्वतः घरच्या घरी साफ करू शकता. यामुळे विजेचे बिल २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.3. गॅस लीकेज तपासा: तंत्रज्ञ गॅस कमी आहे असे सांगत असेल, तर आधी लीकेज कुठे आहे हे दाखवायला सांगा. केवळ गॅस भरून उपयोग नसतो, लीकेज काढणे महत्त्वाचे असते.4. विश्वसनीय तंत्रज्ञ: नेहमी नामांकित ॲप्स किंवा जुन्या ओळखीच्या मेकॅनिककडूनच काम करून घ्या.
advertisement
8/8
एसी सर्विसिंग म्हणजे केवळ पाणी मारून साफ करणे नव्हे, तर ती तुमच्या मशीनची कार्यक्षमता वाढवणारी प्रक्रिया आहे. पण, थोडे जागरूक राहिलात तर तुम्ही 'सीझन'च्या नावाखाली होणाऱ्या लूटमारीपासून स्वतःला वाचवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
AC सर्विसच्या नावाखाली तुमची लूट तर होत नाही ना? गॅस भरण्यापासून ते जेट वॉशपर्यंत; जाणून घ्या मार्केटचे खरे रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल