TRENDING:

Success Story: शिक्षणानंतर व्यवसायाकडे वळला, 1250 रुपयात केली सुरूवात, महिन्याला 2 लाख उलाढाल

Last Updated:
फाईन आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील घरगुती व्यवसायाला नवा आयाम दिला. मसाला उद्योगातून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
1/7
शिक्षणानंतर व्यवसायाकडे वळला, 1250 रुपयात केली सुरूवात, महिन्याला 2 लाख उलाढाल
फक्त बाराशे पन्नास रुपयांत सुरू झालेला मसाल्यांचा छोटासा व्यवसाय आज मोठ्या स्तरावर झेपावला आहे. हा यशस्वी प्रवास तरुण उद्योजक स्वप्निल टकले यांचा आहे.
advertisement
2/7
फाईन आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील घरगुती व्यवसायाला नवा आयाम दिला. मसाला उद्योगातून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
3/7
सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासात सुरुवातीला स्वप्निल यांनी घरगुती पातळीवर मसाले तयार करून छोटे दुकान सुरू केले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रदर्शनांत आणि एक्झिबिशन्समध्ये सहभागी होऊन मसाले विकायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले मसाले ग्राहकांना विशेष आवडले आणि व्यवसाय वाढत गेला.
advertisement
4/7
स्वप्निल यांच्या मसाल्यांची खासियत म्हणजे ते कुठल्याही मशीनवर भाजले जात नाहीत. सर्व मसाले मंद आचेवर गॅसवर ठेवून हातानेच भाजले जातात. त्यामुळे मसाल्यांना आणि भाजणीला एक वेगळीच घरगुती चव येते.
advertisement
5/7
पारंपरिक पदार्थ जसेच्या तसे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन त्यांनी भाजीसाठी स्पेशल मसाला तयार केला आहे.
advertisement
6/7
या एका मसाल्यामुळे कोणतीही भाजी झटपट आणि चविष्ट बनते. म्हणून ग्राहकांत त्यांची मोठी मागणी आहे.
advertisement
7/7
फक्त 1250 रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज सहाशे स्क्वेअर फुट फॅक्टरीपर्यंत पोहोचला आहे. येथे अनेक जण काम करतात आणि या व्यवसायातून आज स्वप्निल टकले महिन्याला 2 लाख उलाढाल करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: शिक्षणानंतर व्यवसायाकडे वळला, 1250 रुपयात केली सुरूवात, महिन्याला 2 लाख उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल