TRENDING:

ऑफिसला पुन्हा लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,दादर-ठाणे मार्गावर तांत्रिक बिघाड, कामावर जाणाऱ्यांचे हाल

Last Updated:
मध्य रेल्वेची मुंबई ते ठाणे जलद मार्गिका घाटकोपर विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ठप्प, प्रवासी आणि ऑफिसला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
advertisement
1/5
ऑफिसला पुन्हा लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,दादार-ठाणे मार्गावर बिघाड
आठवड्याला सुरुवात होऊन एक दिवस झाला नाही तर पुन्हा रडगाणं सुरू, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांची घाई होणार आहे.
advertisement
2/5
मुंबईवरून ठाण्याकडे जाणारी जलद मार्गिका तांत्रिक कारणामुळे अचानक ठप्प झाली. सकाळी कामावर वेळेत पोहोचण्याच्या घाईत असलेल्या हजारे कर्मचाऱ्यांचे कामगारांचे आज मोठे हाल झाले. हा तांत्रिक बिघाड नेमका घाटकोपर आणि विक्रोळी या स्थानकादरम्यान झाल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
3/5
जीवघेण्या गर्दीत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे लाइफलाइन! पण हीच लाइफलाइन सकाळी-सकाळी ठप्प झाल्यामुळे प्रवास करणं कठीण झालं आहे. त्याचं कारण असं की गर्दी वाढली आणि त्यामुळे सकाळी सकाळी ट्रेन सोडाव्या लागत आहेत.
advertisement
4/5
प्रवाशांनी भरलेल्या प्लॅटफॉर्मवर आणि थांबलेल्या गाड्यांमध्ये प्रवासी प्रचंड त्रस्त आहेत. प्रत्येक जण आपल्या घड्याळाच्या काट्याकडे पाहत हताश होऊन पाहात आहेत. आज पुन्हा एकदा लेट मार्क लागणार हे दिसत आहे.
advertisement
5/5
रेल्वे प्रशासनाने तात्काळ उच्च अधिकाऱ्यांना या बिघाडाची माहिती दिली आहे आणि तांत्रिक बिघाड त्वरित दूर करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. मात्र, मार्गिका पूर्ववत होईपर्यंत मुंबई ते ठाणे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
ऑफिसला पुन्हा लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,दादर-ठाणे मार्गावर तांत्रिक बिघाड, कामावर जाणाऱ्यांचे हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल