TRENDING:

Dadar Name: 99% लोकांना माहितीच नाही, दादर स्टेशनला नाव कसं पडलं? वाचा रंजक इतिहास

Last Updated:
Dadar Station Name: मध्य रेल्वेवरील कायमच गजबजलेलं रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे असे दोन्हीही मार्ग या ठिकाणी आहेत. सोबतच दादरवरून देशातील कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी जाण्यासाठी अनेक एक्सप्रेस सुद्धा याच स्थानकावरूनच सुटतात. त्यामुळे अनेक दृष्टीने हे रेल्वे स्थानक फार विशेष आहे. पण तुम्हाला माहितीये का 'दादर' रेल्वे स्थानकाला दादर हे नाव कसं मिळालं? चला तर मग जाणून घेऊया...
advertisement
1/7
99% लोकांना माहितीच नाही, दादर स्टेशनला नाव कसं पडलं? वाचा रंजक इतिहास
मुंबईचे केंद्रस्थान असलेल्या या स्थानकाचा त्याच्या नावाप्रमाणेच रंजक इतिहास आहे. 1868 साली दादर रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. दादर स्थानकाचे नाव हे एका बंधाऱ्यावरुन ठेवण्यात आल्याची ख्याती आहे. माहिम बेट आणि परळ बेटाला जोडणाऱ्या बंधाऱ्याला दादर असे म्हटले जात होते.
advertisement
2/7
असंही म्हटलं जातं की, दादरमधून जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या मार्गांमुळे तिथे दोन भाग निर्माण झाले होते. दोन्ही भाग जोडण्यासाठी आणि लोकांना ये जा करण्यासाठी एक ब्रीज निर्माण करण्यात आला. ब्रीजला मराठीत दादर म्हटले जाते. त्यामुळे त्यास दादर असेही म्हटले गेले. दादर हे ठिकाण मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे.
advertisement
3/7
दादर रेल्वे स्थानकाला पूर्वी वेगळं नाव होतं. दादर या शहराला मुंबईकर 'खोतवाडी' म्हणून ओळखतात. ही गोष्ट आजही 99 टक्के लोकांना माहितच नाही. ब्रिटीशांच्या काळात दादरमध्ये अनेक वाड्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे, खोतवाडी. खोत नावाचं एक कुटुंब होतं, त्यांच्या नावानेच हे 'खोतवाडी' नाव मिळालं.
advertisement
4/7
खरंतर, खोत हे एक जमीनदार होते. हे नाव सुद्धा तिथे स्थायिक असणाऱ्या एका कुटुंबावरून पडले. 1900च्या दशकात, मुंबईत अनेक ऑफिसेसची सुरूवात झाली, लोकसंख्या वाढत गेली. शिवाय, दादरचे शहरीकरण होत गेले. या भागात रेल्वे स्टेशन बांधले गेले आणि त्याचे नाव ठेवण्यात आले 'दादर', जे त्यावेळी असलेल्या गावाचे अधिक प्रचलित नाव होते.
advertisement
5/7
दादरमध्ये असे अनेक ठिकाण आहेत की, जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. दादरचं फुल मार्केट, राजकीय दृष्ट्‍या महत्त्वाचं मानलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराज पार्क, राज ठाकरेंचं घर 'शिवतीर्थ', ज्या ठिकाणी अनेक कलाकार घडले ते शिवाजी मंदीर नाट्यगृह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक असे अनेक ठिकाण या दादरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.
advertisement
6/7
येथेच मराठी चित्रपटांसाठी हक्काचे प्लाझा थिएटर सुद्धा आहे, चौपाटीजवळ चैत्यभूमी आहे, तेथे दरवर्षी लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी येतात, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, चाळी आणि आता निर्माण झालेल्या टोलेजंग इमारती असे वेगवेगळे परिसर दादरमध्ये आहेत, हे असं दादरचं वैभव तुम्हाला पाहायला मिळेल.
advertisement
7/7
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलही साजरा केला जातो. प्राचीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, ऐतिहासिक किल्ल्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन, चित्रकला, हस्तकला कार्यशाळा, फूड फेस्ट, संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल या कला महोत्सवात असते. 2022 पासून हा फेस्टिव्हल सुरू करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हलही दादरची नवी सांस्कृतिक ओळख बनू लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Dadar Name: 99% लोकांना माहितीच नाही, दादर स्टेशनला नाव कसं पडलं? वाचा रंजक इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल