TRENDING:

Dr. Babasaheb Ambedkar Home: मुंबईत जपलाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा, एकदा तरी अवश्य भेट द्या

Last Updated:
मुंबईतील दादर येथील 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून हे पवित्र ऐतिहासिक स्थान अनेक अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. डॉ. आंबेडकर यांचा भारतीय समाजकारणातील प्रभाव आणि संविधाननिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास करत असताना अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला होता.
advertisement
1/5
मुंबईत जपलाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा, एकदा तरी भेट द्या
मुंबईतील दादर येथील 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून हे पवित्र ऐतिहासिक स्थान अनेक अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. डॉ. आंबेडकर यांचा भारतीय समाजकारणातील प्रभाव आणि संविधाननिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
advertisement
2/5
'राजगृह' ही तीन मजली ऐतिहासिक वास्तू आहे जिचे बांधकाम 1931 साली सुरू झाले आणि 1933 मध्ये पूर्ण झाले.राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास करत असताना अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला होता.
advertisement
3/5
यामध्ये आंबेडकर कुटुंबाने वापरलेली भांडी, बाथ टब, जुने फोटो, गरम पाण्याचे यंत्र, पलंग आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा यांचा समावेश आहे. विशेषत: त्यांच्या अध्ययन कक्षातील टेबल आणि छडीसह संविधानाची प्रत देखील संग्रहित केली आहे. या कक्षातच बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार केले होते. राजगृहामध्ये बाबासाहेबांचे अस्थिकलशदेखील ठेवले गेले आहेत ज्यामुळे हा स्थान अधिक पवित्र मानला जातो.
advertisement
4/5
दररोज सुमारे 200 ते 250 लोक राजगृहाला भेट देतात विशेषत महापरिनिर्वाण दिन आणि आंबेडकर जयंतीस येथे भक्तांची संख्या वाढते. राजगृह हे डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे आणि त्यांच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक घटकांचे एक अमूल्य ठेवा आहे जे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी ठरते.
advertisement
5/5
तुम्हाला राजगृहाला भेट द्यायची असल्यास मुंबईतील दादर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले हिंदू कॉलनी येथे या ऐतिहासिक स्थळावर येऊ शकता. राजगृहाची भेट घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही, मात्र मंगळवारी ते बंद असते. हे पवित्र स्थान सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान खुलं असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Dr. Babasaheb Ambedkar Home: मुंबईत जपलाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा, एकदा तरी अवश्य भेट द्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल