TRENDING:

Ghatkopar Incident : 4 फूट पुढे असल्याने गेला जीव! घाटकोपर अपघातातील टॅक्सीचालकाच्या मृत्यूची Inside Story

Last Updated:
Ghatkopar Incident : घाटकोपर होर्डिंग अपघातात एका टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नीसह चार मुले असा परिवार आहे. (विजय देसाई, प्रतिनिधी)
advertisement
1/5
4 फूट पुढे असल्याने.. घाटकोपर अपघातातील टॅक्सीचालकाच्या मृत्यूची Inside Story
घाटकोपर येथील होर्डिंग अपघातात नालासोपारा येथील टॅक्सी चालक सतीश बहाद्दूर सिंह (वय 51) यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी शीला सिंह, मुलगा शुभम सिंह (वय 29), शिवम सिंह (वय 24), सत्यम सिंह, मुलगी सुप्रिया सिंह असा परिवार आहे.
advertisement
2/5
सतीश बहादूर सिंह हे दररोज इको टॅक्सी कार घेऊन भाड मारण्यासाठी जात असत. काल (मंगळवार) सकाळी ते मुंबईत भाड घेऊन गेले होते. त्यानंतर ते ठाणामार्गे नालासोपारा येथे येणार होते. मात्र, येताना सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले होते.
advertisement
3/5
जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी सीएनजीच्या लाईनमध्ये उभे होते. शेवटची टॅक्सी त्यांची होती जर 4 फूट मागे असते तर ते वाचले असते. संध्याकाळी 3 च्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणं झालं होतं. मी घरी येत असल्याचे त्यांनी सांगितले ते बोलणे शेवटचे ठरले.
advertisement
4/5
होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे. संबंधित प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं तर अशी दुर्घटना झाली नसती.
advertisement
5/5
अशा बेकायदा व अनाधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Ghatkopar Incident : 4 फूट पुढे असल्याने गेला जीव! घाटकोपर अपघातातील टॅक्सीचालकाच्या मृत्यूची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल