अचानक सगळीकडे हिरव्या रंगाचा वायू पसरला, एकाने जागेवर जीव सोडला, मुंबईजवळील भयानक घटना PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबई जवळील वसई इथं एक भयानक घटना घडली आहे. वसई विरार महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा गॅस लिक झाला. या अपघातात १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. (विजय देसाई, प्रतिनिधी)
advertisement
1/8

मुंबई जवळील वसई इथं एक भयानक घटना घडली आहे. वसई विरार महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा गॅस लिक झाला. या अपघातात १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
advertisement
2/8
वसई पश्चिमेकडील माणिकपुर पोलीस स्टेशन हद्दीत वसई पश्चिम येथील दीवाणमान स्मशानभूमीजवळील वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी टाकीवर आज (मंगळवार) सायंकाळी अंदाजे ५ वाजेच्या सुमारास मोठा अपघात घडला. पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरिन सिलेंडरला अचानक गळती सुरू झाली. या रासायनिक वायुचा गंभीर परिणाम आसपास असलेल्या १० ते १५ लोकांवर झाला.
advertisement
3/8
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या देव पारडीवाला यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. तर ६ जणांना डिवाइन हॉस्पिटल आणि वसई गावातील मनपाच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
4/8
क्लोरिनची गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परिसर रिकामा करण्यात आला असून पुढील धोक्यांची तपासणी सुरू आहे.
advertisement
5/8
दरम्यान, या घटनेबाबत मनपा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोणतीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
advertisement
6/8
स्थानिक नागरिकांनी हा प्रकार मनपाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे आणि त्वरित पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
advertisement
7/8
पाणी टाकीजवळील परिसर काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
8/8
अग्निशमन दलाच्या जवानांनी लिक झालेले सिलेंडर हे घटनास्थळावरून दूर नेऊ निकामी केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
अचानक सगळीकडे हिरव्या रंगाचा वायू पसरला, एकाने जागेवर जीव सोडला, मुंबईजवळील भयानक घटना PHOTOS