TRENDING:

Smriti Mandhana : वडिलांना हार्ट अटॅक ते WhatsApp स्क्रीनशॉट, स्मृती-पलाशच्या आयुष्यातल्या वादळी 3 दिवसात काय घडलं?

Last Updated:
भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे. ज्यामुळे लग्नाला आलेले पाहुणे, जोडप्याच्या जवळच्या व्यक्ती आणि स्मृतीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
advertisement
1/11
वडिलांना हार्ट अटॅक ते WhatsApp स्क्रीनशॉट, स्मृती-पलाशच्या आयुष्यात काय घडलं?
स्मृतीचं मूळ गाव असलेल्या सांगलीमध्ये रविवार 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचा लग्न सोहळा पार पडणार होता, पण अचानक घडलेल्या घटनांमुळे लग्न शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आलं. तेव्हापासून घडत असलेल्या काही घटनांमुळे सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे.
advertisement
2/11
21 नोव्हेंबर : शुक्रवारपासून स्मृती आणि पलाशच्या लग्न समारंभाच्या सोहळ्यांना सुरूवात झाली होती. या दिवशी स्मृती आणि पलाशसह पाहुण्यांनी सांगलीच्या रिसॉर्टमध्ये संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. समारंभातल्या व्हिडिओमध्ये स्मृती आणि पलाश एकत्र परफॉर्म करताना दिसत आहे.
advertisement
3/11
23 नोव्हेंबर : लग्नाच्या दिवशी भारतीय महिला क्रिकेट टीमचे बरेच सदस्य लग्नासाठी सांगलीच्या रिसॉर्टमध्ये आले, ज्यात वराच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. या बहुप्रतिक्षित समारंभाची सगळी तयारी झाली होती.
advertisement
4/11
23 नोव्हेंबरच्या दुपारी अचानक सगळं काही बदललं आणि मंडपामध्ये ऍम्ब्युलन्स दाखल झाली. स्मृतीच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका लागल्याचं निष्पन्न झालं.
advertisement
5/11
23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा आंनी मीडियाला अपडेट दिली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना नाश्ता करत असताना त्यांची प्रकृती बिघडली, यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. स्मृती वडिलांच्या जवळची असल्यामुळे वडील पूर्ण बरे होईपर्यंत लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे, असं स्मृतीच्या मॅनेजरने सांगितलं.
advertisement
6/11
रविवारी संध्याकाळी पलाशची प्रकृतीही बिघडली आणि त्याच्यावरही सांगलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर सोमवारी पलाश आणि त्याचं कुटुंब मुंबईला परतलं, यानंतर पलाशला गोरेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आलं. लग्न पुढे ढकललं गेल्यामुळे पलाशवर तणाव आला आणि त्याची प्रकृती बिघडली. तो 4 तास रडत होता, अशी माहिती पलाशच्या आईने दिली.
advertisement
7/11
पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं भावनिक नातं निर्माण झालं आहे, पलाश स्मृतीच्या वडिलांशी भावनिकरित्या जोडला गेला आहे. त्यामुळे स्मृतीचे वडील पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय पलाशने घेतला, असं पलाशची आई म्हणाली.
advertisement
8/11
24 नोव्हेंबर : लग्न पुढे ढकललं गेल्यानंतर पलाशची बहीण पलक मुच्छलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे, या कठीण काळात कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर राखा, असं आवाहन पलक मुच्छलने केलं.
advertisement
9/11
24 नोव्हेंबरच्या संध्याकाळी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुडा आणि लग्नाबद्दलच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या. स्मृतीची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जसह तिच्या सहकाऱ्यांनीही लग्नाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ डिलीट केले, त्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या.
advertisement
10/11
25 नोव्हेंबरच्या सकाळपासून पलाश मुच्छलचे कथित व्हॉट्सऍप चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात तो एका महिलेसोबत बोलत असल्याचा दावा करण्यात आला. मेरी डिकोस्टा नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने सगळ्यात आधी हे चॅट शेअर केले, यानंतर रेडिटवर मोठ्या प्रमाणावर हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. पण आता मेरी डिकोस्टाचं इन्स्टाग्राम अकाउंट डिऍक्टिव्हेट झालं आहे.
advertisement
11/11
पलाश मुच्छल आणि महिलेचे हे चॅट मे 2025 पासूनचे असल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेला. न्यूज 18 या व्हॉट्सऍप चॅटची पुष्टी करत नाही. या चॅटमध्ये पलाशने महिलेला स्विमिंगसाठी आमंत्रित केल्याचा आणि भेटण्याचा आग्रह केल्याचा दावा केला गेला आहे. तसंच महिला जेव्हा पलाशला त्याच्या रिलेशनशीपबद्दल विचारते तेव्हा तो उत्तर द्यायला टाळाटाळ करत असल्याचा दावाही केला गेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : वडिलांना हार्ट अटॅक ते WhatsApp स्क्रीनशॉट, स्मृती-पलाशच्या आयुष्यातल्या वादळी 3 दिवसात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल