कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, इथं पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:PRATIKESH PATIL
Last Updated:
मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. 21 ऑक्टोबरलाही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/5

अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्यावर येत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
advertisement
2/5
21 ऑक्टोबरलाही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे पालघरसह कोकणातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसारनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या हवेच्या चक्रीय स्थितीमुळे किनारपट्टीवर बाष्पयुक्त वारे येत आहेत. प्रामुख्याने ठाणे, पालघर जिल्ह्यांवरून भोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तर महाराष्ट्रात पोहचले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील तापमान सरासरी 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
advertisement
4/5
त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. तसेच अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/5
तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून 40 कीमी प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.