Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची...' लालबागच्या राजाची ; पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Lalbaugcha Raja 2025 First Look: यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
1/8

गणेशोत्सव (Ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक पाहायला मिळाली. अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली.
advertisement
2/8
गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे.
advertisement
3/8
लालबगच दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात. इतकच नव्हे अगदी राजकारण्यांपासून ते मोठमोठ्या सिनेतारकांपर्यंत सर्व जण लालबागच्या चरणी लीन होतात.
advertisement
4/8
यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे… त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे…
advertisement
5/8
लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकरांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळत आहे.
advertisement
6/8
यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
7/8
लालबागच्या राजाचं हे फोटो सेशनसाठी होणारं पहिलं दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झालंय…
advertisement
8/8
लालबागचा राजा आणि भक्तांचं विशेष नातं आहे. नवासाला पावणारा गणपती म्हणून राजाची विशेष ख्याती आहे. त्यामुळे त्याच्या चरणी प्रत्येकजण लीन होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची...' लालबागच्या राजाची ; पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक