TRENDING:

Weather Alert: कोकणात वातावरण तापलं, मुंबई-ठाण्यात वेगळाच अलर्ट, गुरुवारचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. ऐन थंडीच्या दिवसांत उन्हाचे चटके जाणवत असून मुंबई-ठाण्यात देखील विचित्र हवामान दिसत आहे.
advertisement
1/5
कोकणात वातावरण तापलं, मुंबई-ठाण्यात वेगळाच अलर्ट, गुरुवारचं हवामान अपडेट
गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थोडीशी गार हवा आता कमी झाली आहे. सकाळचा गारवा जवळजवळ संपला असून, वातावरणात उष्णता पुन्हा वाढू लागली आहे. आकाश स्वच्छ व कोरडे असल्यामुळे आजही संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उकाडा आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे, तर रात्रीची थंडी देखील विशेष जाणवणार नाही.
advertisement
2/5
मुंबईत आज उष्णता वाढलेलीच राहणार आहे. किमान तापमान साधारण 22°C च्या आसपास राहील, तर कमाल तापमान 33°C पर्यंत जाईल. दिवसा उकाडा जाणवेल आणि संध्याकाळीही गारवा फारसा जाणवणार नाही. हवा कोरडी असल्याने थंडीचा परिणाम विशेष दिसणार नाही.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणीही हवामान जवळपास एकसारखेच ठेवणार आहे. किमान तापमान 21–22°C दरम्यान राहील, तर कमाल तापमान 33–34°C पर्यंत पोहोचेल. गेल्या दोन-तीन दिवसांत जाणवणारा थोडासा गारवा आता जवळजवळ कमी झाला असून दिवसभर हलका उकाडा जाणवेल.
advertisement
4/5
पालघरमध्ये आज सकाळपासूनच वातावरण थंडगार आहे. किमान तापमान 18–20°C पर्यंत राहील, तर दुपारी पारा 30–31°C पर्यंत जाऊ शकतो. हवामान कोरडे राहील आणि पाऊस नाही. गावठाण भाग असल्यामुळे दुपारी उब जाणवेल, परंतु संध्याकाळी पुन्हा हलकी थंडी जाणवेल. आकाश स्वच्छ असेल.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवर, म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत आज हवामान शांत आणि कोरडे राहेल. सकाळी हलकासा गारवा जाणवले. किमान तापमान 20–22°C तर कमाल तापमान 30–32°C पर्यंत जाईल. पावसाची कुठेही शक्यता नाही. समुद्रकिनारी भागांमध्ये वारा असल्याने दुपारी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. संध्याकाळ ते रात्री तापमान पुन्हा 22–23°C वर येईल आणि हवेत हलकी थंडी जाणवेल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात वातावरण तापलं, मुंबई-ठाण्यात वेगळाच अलर्ट, गुरुवारचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल