TRENDING:

आजचं हवामान: मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याचं अपडेट काय?

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात बदल जाणवत असून नोव्हेंबरमध्ये हवापालट झाल्याचे चित्र आहे. मे महिन्यापसून कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती गेतली आहे.
advertisement
1/5
मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याचं अपडेट
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली असून, दिवसाचं ऊन आणि सकाळ-संध्याकाळी हलका गारवा जाणवणार आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाला अखेर विश्रांती मिळाली आहे.
advertisement
2/5
मुंबईत आजचे हवामान कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरणात किंचित गारवा जाणवेल, पण दुपारी ऊन तीव्र असेल. तापमान सुमारे 30 ते 33 अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते. रात्री थोडा थंडावा जाणवेल. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून आकाश अंशतः स्वच्छ राहील.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हवामान कोरडे राहील. सकाळी गारवा, तर दुपारी उन्हाची तीव्रता थोडी वाढेल. तापमान सुमारे 29 ते 32 अंश सेल्सियस राहू शकते. आकाश मुख्यतः स्वच्छ ते अंशतः ढगाळ, परंतु पावसाची शक्यता नाही. उपनगर आणि किनारपट्टीपासून थोडे आतल्या भागात संध्याकाळी हलकी थंडी जाणवू शकते.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील आणि थंडीची हलकी चाहूल लागलेली जाणवेल. सकाळ-संध्याकाळ गारवा, तर दुपारी ऊन असे मिश्र हवामान राहील. तापमान 28 ते 31 अंश सेल्सियस दरम्यान राहील. पावसाची शक्यता अत्यल्प असून वारे थोडे गार असतील.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ ते थोडे ढगाळ राहील. तापमान सुमारे 27 ते 30 अंश सेल्सियस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्याजवळ गार वारे वाहतील आणि हलका थंडीचा स्पर्श जाणवेल. पावसाने विश्रांती घेतल्याने आर्द्रता कमी झाली आहे, त्यामुळे हवामान तुलनेने सुखद राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आजचं हवामान: मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याचं अपडेट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल