TRENDING:

Weather Alert: ऐन हिवाळ्यात वारं फिरलं; पाऊस नव्हे आता वेगळा अलर्ट, मुंबईसह कोकणातील हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. ऐन हिवाळ्यात थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात वाढ होत आहे.
advertisement
1/5
ऐन हिवाळ्यात वारं फिरलं; पाऊस नव्हे वेगळा अलर्ट, मुंबईसह कोकणातील हवामान अपडेट
गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर ओसरत असून आता मुंबईसह कोकणातील हवामानात पुन्हा बदल दिसू लागला आहे. सकाळच्या गारव्यानंतर दिवसभरात उष्णता वाढत आहे. आज कोकण किनारपट्टीपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईपर्यंत सर्वत्र हवामान पूर्णत: कोरडे राहणार आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही आणि तापमानात थोडी वाढ दिसू शकते. बुधवारचं अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळी हलका गारवा जाणवेल. किमान तापमान 21–22°C इतकं राहील. मात्र दिवसा उन्हाची तीव्रता वाढून तापमान 31–33°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आर्द्रता तुलनेने कमी असल्याने पाऊस नाही, पण दुपारी हवेत उष्णता जाणवेल. संध्याकाळी पुन्हा हलकी थंड हवा असेल, पण थंडी वाढेल अशी परिस्थिती नाही.
advertisement
3/5
नवी मुंबई आणि ठाण्यात आजचे हवामान मुंबईपेक्षा थोडं अधिक सुखद राहणार आहे. सकाळचे तापमान 20–21°C पर्यंत खाली जाईल, त्यामुळे हलकी थंडी जाणवेल. दिवसा तापमान 31–32°C च्या आसपास राहील. मागील दोन दिवसांच्या तुलनेत 1 अंशांनी उष्णता वाढलेली दिसू शकते. वातावरण पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडेच राहणार आहे.
advertisement
4/5
पालघरमध्ये आज कोकणातील इतर शहरांच्या तुलनेत थोडा जास्त गारठा जाणवेल. सकाळी तापमान 18–20°C पर्यंत खाली उतरेल. दिवसा तापमान 30–31°C पर्यंत जाईल. हवा कोरडी असून दुपारी ऊन जाणवेल. रात्री पुन्हा हलकी थंडी असेल, परंतु वातावरण शांत आणि स्थिर राहील.
advertisement
5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान पूर्णपणे कोरडे राहील. सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवेल. रायगडमध्ये किमान तापमान 20–21°C, रत्नागिरीत 21°C, तर सिंधुदुर्गमध्ये 21–22°C राहण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत तापमान हळूहळू वाढत जाईल आणि या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30–32°C दरम्यान पोहोचेल. गेल्या काही दिवसांत जिथे हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती, तिथे आता हवामान स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: ऐन हिवाळ्यात वारं फिरलं; पाऊस नव्हे आता वेगळा अलर्ट, मुंबईसह कोकणातील हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल