Weather Update: पाऊस गेला अन् पारा चढला, ऐन हिवाळ्यात वाढलं तापमान, मुंबई, कोकणात विचित्र हवामान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळी संकट टळलं असून आता ऐन हिवाळ्यात तापमान वाढलं आहे.
advertisement
1/4

डिसेंबर जवळ येत असताना कोकण किनारपट्टीसह मुंबई उपनगरात हवामान कोरडे आणि स्थिर राहिले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी जाणवते आहे, मात्र मुंबई परिसरात उष्णता वाढली असून तापमानात साधारण 1–2 अंशांनी वाढ दिसतेय. रात्री आणि सकाळी गारवा जाणवत असला तरीही ‘कडाक्याची थंडी’ अजून आली नाही. कोकणातील बहुतेक जिल्ह्यांमध्येही हवा कोरडी असून आज पावसाची शक्यता नाही.
advertisement
2/4
मुंबईत आज सकाळी तापमान 21–22°C पर्यंत खाली जाईल, ज्यामुळे हलका गारवा जाणवेल. मात्र दिवसा तापमान 32–33°C पर्यंत वाढेल आणि आर्द्रतेमुळे उकाड्यासारखी जाणीव होण्याची शक्यता आहे. सागरी वाऱ्यामुळे दुपारी थोडा दिलासा मिळेल, पण संध्याकाळपर्यंत उष्णता टिकू शकते. रात्री पुन्हा तापमान 23–24°C च्या आसपास स्थिर राहील. संपूर्ण दिवस हवा कोरडी आणि आकाश स्वच्छ राहील.
advertisement
3/4
ठाणे नवी मुंबई भागात आज सकाळचे तापमान 20–21°C राहील, त्यामुळे मुंबईपेक्षा थोडा जास्त गारवा जाणवू शकतो. दिवसा तापमान 31–32°C पर्यंत पोहोचेल. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत 1 अंशाने उष्णता वाढलेली दिसू शकते. संध्याकाळी हलकी थंडी परत जाणवेल आणि रात्रीचे तापमान 22°C च्या आसपास स्थिर राहील. वातावरण पूर्णपणे कोरडे असून वाऱ्याचा वेग सौम्य राहील.
advertisement
4/4
मुंबई ठाण्यातील हवामानात अनेक बदल होतायत पण पालघरमध्ये थंडी तुलनेने जास्त जाणवते. आज सकाळचे तापमान 18–19°C पर्यंत खाली जाऊ शकते. दिवसा तापमान 30–31°C पर्यंत वाढेल. या भागात हवा कोरडी असून रात्री पुन्हा तापमान घटून 19–20°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. वातावरण शांत, स्वच्छ आणि थोडं थंड.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Update: पाऊस गेला अन् पारा चढला, ऐन हिवाळ्यात वाढलं तापमान, मुंबई, कोकणात विचित्र हवामान